ठाणे Contract Employees Strike : ऐन गणेशोत्सवात टीएमटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं ठाणेकरांच्या त्रासात भर पडली होती. गेल्या चार दिवसांपासून ठाणे परिवहन सेवेतील सुमारे 500 कर्मचारी आंदोलनाला बसले होते. . उपाययोजना न झाल्यास भविष्यात ठाण्यातील परिवहन सेवा कोलमडण्याची चिन्हे आता दिसू लागली होती. ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संप सुरूच ठेवण्याचा निर्णय : ठाणे महापालिका परिवहन बससेवेच्या कंत्राटी बसचालकांचा चौथ्या दिवशीही संप सुरूच राहिला होता. 235 पुरुष वाहक आणि 125 महिला वाहकांनी निश्चित वेतन मिळावं, कंत्राटी कामगारांची संबंधित ठेकेदारांकडून होणारी पिळवणूक थांबवावी या प्रमुख मागणीसाठी संप पुकारल्याचं दिसून आले. गणेशोत्सव काळात पुकारण्यात आलेल्या या संपामुळे प्रवाशांवर मोठा परिणाम होत आहे. प्रशासनानं या संपाची कोणतीही दखल न घेतल्यानं कंत्राटी वाहकांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
दिवसभरात काय घडलं
- प्रशासनाला देण्यात आली यादीची माहिती : या संपाबाबत प्रशासनाला अगोदरच कल्पना देण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं आम्हाला शस्त्र उचलावं लागल्याचं कर्मचारी सांगत होते. पगार अत्यावश्यक असल्याचं कर्मचारी सांगत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा : शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रयत्नांमुळे ठाण्याला परिवहन सेवा मिळाली. त्यामुळंच आनंद दिघे यांनी यापुढे कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी उत्तम काम केले आहे. ठाण्यातील नागरिकांना अखंडित सेवा देताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही तशीच अपेक्षा असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.
वाहतुकीवर परिणाम : ठाण्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं गणेशोत्सवाच्या काळात परिवहन सेवेची वाहतूक व्यावस्था ठप्प झालीय. काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं होतं. या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशाराही दिला होता. मात्र, गणेशोत्सवादरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ शकते, हे लक्षात घेऊन राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांवर नेण्यास मंजुरी दिली होती. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं. आता ठाण्यातील विस्कळीत बससेवा पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -
- Ganesh festival 2023 in Mumbai: मुंबईत १३ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, वाहतुकीकरिता 'असा' असणार बदल
- Supriya Sule parliament special session : सिंचनासह बँक घोटाळ्याची चौकशी करा, नात्याचा प्रश्न असेल तर...सुप्रिया सुळे यांचे संसदेत मोठं वक्तव्य
- Ganeshotsav Muhurta 2023 : गणेशाच्या स्थापनासाठी कधी आहे मुहूर्त; पहा व्हिडीओ