ETV Bharat / state

शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचे शासनाला निर्देश द्यावे, सुभाष देशमुख यांची राज्यपालांकडे मागणी

महाआघाडी सरकारने बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काडूनघ्यावा अशी मागणी सुभाष देशमुख यांनी राज्यापालांकडे केली आहे.

author img

By

Published : Mar 6, 2020, 9:35 PM IST

Subhash Deshmukh has demanded  government be directed to give farmers  right to vote
शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचे शासनाला निर्देश करा, सुभाष देशमुख यांची राज्यपालांकडे मागणी

सोलापूर - महाआघाडी सरकारने बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेत त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांना मतदानाचा अधिकार देण्यास शासनाला निर्देश करावेत, अशी मागणी माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी मुंबई येथे राज्यपाल भगतिसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा - खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींच्या अडचणीत वाढ, सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजप सरकारने शेतकर्‍यांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्काची बाजार समिती असावी म्हणून त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देत शेतकर्‍यांचा सन्मान केला होता. मात्र महाआघाडी सरकारने केवळ विरोध म्हणून हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय तर झाला आहेत शिवाय त्यांचा अपमानही झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्यास शासनास निर्देश करावेत, असे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - सोलापुरात 'कोरोना'चा रुग्ण नाही, अश्विनी रुग्णालयाचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.