ETV Bharat / state

Farmers Rasta Roko : मंद्रुप तहसील कार्यालयासमोर तीनशे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

मंद्रुप तहसील कार्यालयासमोर भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्याविरोधात तीनशे शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. शेतजमीनीवर एमआयडीसीचा बोजा चढवण्यात आला ( MIDC on Agricultural Land ) आहे.

author img

By

Published : Dec 3, 2022, 2:50 PM IST

Shiv Sena rasta roko
शिवसेना रास्ता रोको

सोलापूर : भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदार संघात गेल्या पंचाहत्तर दिवसांपासून आंदोलन सुरू ( Agitation In Subhash Deshmukh Constituency ) आहे. मंद्रुप तहसील कार्यालयासमोर जवळपास तीनशे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. मंद्रुप शिवारातील अनेक शेतजमीनीवर एमआयडीसीचा बोजा चढवण्यात आला ( MIDC on Agricultural Land ) आहे. याला कडाडून विरोध करत मंद्रुप ग्रामपंचायत व तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

सोलापूर रास्ता रोको

महामार्गावर रास्ता रोको : उद्धव ठाकरे गटाच्यावतीने वडकबाळ येथे सोलापूर विजयपूर महामार्गावर रास्ता रोको करत आंदोलन करण्यात ( Rasta Roko On Solapur Vijaypur highway ) आले. उद्धव ठाकरे शिवसेनेचे अमर पाटील यांनी हे आंदोलनात पुढाकार घेतला होता. त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे देखील उपस्थित होते. तसेच योगीराज पाटील,धर्मराज बगले,लिंगराज हुळे,लायकअली पीरजादे,संतोष बरुरे,आकाश गंगदे,सुरेश शेंडगे आदीउपस्थित होते. यावेळी पुरुषोत्तम बरडे व अमर पाटील यांनी भाजप आमदार सुभाष देशमुखवर निशाणा साधला. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा देखील देण्यात आला. भाजप आमदार सुभाष देशमुख याला सर्वस्वी जबाबदार आहेत,असे आरोप करत ,सडकून टीका करण्यात आली.

सुभाष देशमुख खरंच चालू आमदार : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप हद्दीतील ग्रामस्थ गेल्या पंचाहत्तर दिवसांपासून एमआयडीसी विरोधात आंदोलन करत आहेत.जवळपास 300 शेतकऱ्यांच्या जमिनीवर एमआयडीसीचा बोजा चढवण्यात आला ( Three hundred farmers participated in Rasta Roko ) आहे. येथील स्थानिक आमदार भाजपकगे सुभाष देशमुख आहेत. सुभाष देशमुख यांनी या शेतकऱ्यांसाठी काहीही प्रयत्न केले नाही,असा आरोप यावेळी करण्यात आला. ठाकरे गटाचे शिवसेना नेते अमर पाटील, पुरुषोत्तम बरदे, योगीराज पाटील यांनी रास्ता रोको करत भाजप आमदारवर सडकून टीका केली. भाजपचे आमदार सुभाष देशमुख खूपच चालू आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातून भाजपला कमी मतदान पडले आहे. म्हणून ते सूडबुद्धीने राजकारण करत शेतकऱ्यांना त्रास देत आहेत असा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.

सोलापूर विजयपूर महामार्ग बंद : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शेतकऱ्यांची बाजू घेत, सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. भाजप आमदार सुभाष देशमुखमुळेच 300 शेतकऱ्यांच नुकसान होत आहे. या शेतकरी वर्गास एक रुपयादेखील नुकसानभरपाई मिळालेली नाही. बोचरी सहानुभूती दाखवत सुभाष देशमुख फक्त आश्वासन देत आहेत. या विरोधात शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको केला आहे. भविष्यात आम्ही मोठे जनआंदोलन उभे करू, मूक मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. जवळपास अर्धा तास रास्ता रोखल्याने वाहतूक व्यवस्था थाम्बली होती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.