ETV Bharat / state

MLA Jayakumar Gore भाजपा आमदार जयकुमार गोरेंना अंतरीम जामीन मंजूर

जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात भाजपा आमदार जयकुमार गोरे MLA Jayakumar Gore granted bail यांना अखेर सातारा जिल्हा न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे. एकाच्या जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यासह यांच्यासह एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल झाला होता.

author img

By

Published : Aug 12, 2022, 6:53 PM IST

MLA Jayakumar Gore
MLA Jayakumar Gore

सातारा - मायणी (ता. खटाव) येथील एकाच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात भाजपा आमदार जयकुमार गोरे MLA Jayakumar Gore granted bail यांना अखेर सातारा जिल्हा न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे. एकाच्या जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यासह यांच्यासह एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल झाला होता. मागील महिन्यात अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आधी कोर्टापुढे शरण या मगच जामिनासाठी अर्ज करा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार आमदार जयकुमार गोरे न्यायालयात हजर झाले होते.

फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर : फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन न मिळू शकल्याने जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, न्यायालयाने त्यांना शरण येऊन जामीन अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिल्याने काही अंशी दिलासा मिळाला होता. त्यानंतर आमदार गोरे यांनी शरण येत रितसर सातारा जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. शुक्रवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात गोरे यांना अटक करण्याची आवश्‍यकता नसल्याचे म्हणणे मांडल्याने न्यायालयाने भाजपा आमदार जयकुमार गोरे यांना अंतरीम जामीन मंजूर केला.

गोरेंसह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा : मायणी गावातील जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी मायणीतील महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - धक्कादायक, रक्षाबंधनाच्या दिवशीच चाकूने सपासप वार करून युवकाची हत्या Youth murdered with knife in Delhi

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.