रत्नागिरी : मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच ( No Expansion of Cabinet ) नये, असे आपले म्हणणे असल्याचे शिवसेना आमदार भास्कर जाधव ( Shiv Sena MLA Bhaskar JadhavShiv Sena MLA Bhaskar Jadhav ) यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी चिपळूणमध्ये बोलत होते. यावेळी जाधव म्हणाले विस्ताराची गरजच नाही. आता बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस ( Non Accountable Minister ) हे सर्व निर्णय एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असल्यासारखे राबवत आहेत, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे. रत्नागिरी चिपळूण येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर बैठक असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नवीन सरकारला टोला : चिपळूणमध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर बैठक झाली. त्यावेळी आमदार भास्कर जाधव नवीन सरकारवर जोरदार हल्ला चढवला, या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून नाही आणि तो होऊच नये, असे वाटते. कारण बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व निर्ण एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपचा घरचा कार्यक्रम असल्यासारखे राबवत आहेत.
जाधव यांचे भाजपवर जोरदार टीकास्त्र : भाजपने लोकशाहीला मारक असे धोरण महाराष्ट्रात राबवले आहे. शिवसेना संपवण्याचे जे धोरण भाजपने आखले आहे, ते अत्यंत घातक आहे. भाजपने शिवसेनेच्या बाबतीत जो घोळ घातलेला आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने हिताचे आहे का, अशा प्रकारची चर्चा संपूर्ण देशाभरात सुरू आहे. त्यामुळे आमदार जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. लोकशाही संपवण्याचे कटकारस्थान भाजपकडून चालू आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.
शिवसेनाबाबत संपूर्ण देशात चर्चा : यावेळी आमदार जाधव म्हणाले की, शिवसेनेमध्ये जी बंडाळी निर्माण झाली आहे. त्याची चिंता संपूर्ण देशाला आहे. देशातील विविध पक्षांचे विविध राज्यांतील 17 विचारवंत आज एकत्र बसले होते. संजय राऊत यांना ईडीने केलेली अटक ही कायदेशीर आहे का? भाजप विरोधी पक्षाला संपवण्याकरिता ईडीचा वापर करीत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, त्याच पार्श्वभूमीवर आज चिपळूणमध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. भविष्यात कोणतेही संकट आले, तर चिपळूण तालुका सज्ज असल्याचेसुद्धा भास्कर जाधव म्हणाले.