ETV Bharat / state

म्हसळा येथून वाहून गेलल्या युवकाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला; वसिम फकजी यांच्या पथकाला यश

author img

By

Published : Aug 7, 2020, 2:48 PM IST

पाभरे पुलावरून चार पाच तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाहत्या जानसई नदीत उड्या मारल्या होत्या. बदर हळदे या युवकानेही हे धाडस केले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने बदर हा वाहून गेला.दिवेआगरच्या वसीम फकजी यांच्या पथकाला तीन दिवसाने बदरचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

Wasim Fakji rescue team
वसीम फकजी रेस्क्यू टीमला मृतदेह शोधण्यात यश

रायगड- म्हसळा तालुक्यातील पाभरे पुलावरुन जानसई नदीत उडी मारल्यामुळे बेपत्ता झालेला बदर हळदे याचा मृतदेह तीन दिवसाने सापडला आहे. निगडी गावाच्या हद्दीत जानसई नदीकिनारी झाडी झुडपात अडकलेला मृतदेह काढण्यात दिवेआगारच्या रेस्क्यु टिमला यश आले आहे.

पाभरे पुलावरून चार पाच तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाहत्या जानसई नदीत उड्या मारल्या होत्या. बदर हळदे या युवकानेही हे धाडस केले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने बदर हा वाहून गेला. तर इतर युवक हे पोहून नदीकिनारी आले होते. बदर वाहून गेल्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. पोलिसांच्या सहकार्याने दिवेआगारच्या वसिम फकजी टिमने तसेच माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगार, खोपोलीतील रेस्क्यू पथकाने बदर याचा शोध सुरु केला.

दिवेआगरच्या वसीम फकजी याच्या पथकाला तीन दिवसाने बदरचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. आज पहाटे 6 वाजता निगडी गावच्या हद्दीत जानसई नदीकिनारी झाडी झुडपात अडकलेला मृतदेह पथकाने बाहेर काढला. तौसिस अफराद, नासिर साखरकर, मोझम मालपेकर, मुझ्झमिल गोठेकर, फौजान साखरकर व वसिम फकजी यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.