पालघर - पालघर तालुक्यातील पडघा येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मंगळवारी सकाळी फीट आल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश लक्ष्मण उराडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो ग्रामीण शिक्षण संस्था उमरोळी संचलित तु.ल.पाटील माध्यमिक आश्रमशाळा येथे इयत्ता पाचवीत शिकत होता.
आकाश उराडे या विद्यार्थ्याला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक फीट आली व तो चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला आश्रमशाळा प्रशासनाने पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले.
हेही वाचा - शॉर्टसर्किटने लागली आग, शेतकऱ्याचे तब्बल ४ लाखांचे नुकसान
घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले व याप्रकरणी एडीआर दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र, आकाशच्या मृत्यूमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - वसईत दे दणादण! नवरा-बायकोच्या कुटुंबीयांची फ्री-स्टाईल हाणामारी