ETV Bharat / state

काँग्रेसचे आमदार जवळगावकरही कोरोना पॉझिटिव्ह; पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना

author img

By

Published : Jul 30, 2020, 6:34 PM IST

हदगावचे काँग्रेस आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे. दोन दिवसांपूर्वी ताप, सर्दी, खोकला अशी तीव्र लक्षणे जाणवल्यानंतर त्यांनी आरटीपीसीआर प्रणालीत स्वॅब दिला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आमदार जवळगावकरही कोरोना पॉझिटिव्ह
आमदार जवळगावकरही कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड : जिल्ह्यातील काँग्रेसचे आणखी एक आमदार कोरोनाने संक्रमित झाले आहेत. यापूर्वी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे व विधानपरिषदेचे सदस्य आमदार अमर राजूरकर हे बाधित झाले होते. आमदार राजूरकर यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असून आमदार हंबर्डे हे बरे होऊन घरी परतले आहेत.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाने राजकीय पुढाऱ्यांना घेरले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाली. त्यानंतर माजी महापौर, नगरसेवक, माजी नगरसेवक, उपमहापौर अशी मंडळी एकापाठोपाठ बाधित झाली. त्यात आणखी दोन आमदारांची भर पडली. आमदार हंबर्डे यांचे तर पूर्ण कुटुंबीयच कोरोनाच्या तावडीत सापडले होते. त्यातच आता हदगावचे काँग्रेस आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.

काही दिवसापूर्वी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार राजूरकर यांच्यासोबत ते सहभागी झाले होते. तेव्हापासून ते क्वारंटाईनमध्ये होते. खबरदारी म्हणून त्यांनी आपला स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्यावेळी अहवाल निगेटिव्ह आला होता. दोन दिवसांपूर्वी ताप, सर्दी, खोकला अशी तीव्र लक्षणे जाणवल्यानंतर त्यांनी आशा भगवती कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अंकुश देवसरकर यांच्याकडून तपासणी करून घेतली. त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी आरटीपीसीआर प्रणालीत स्वॅब दिला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आमदार जवळगावकर यांच्यावर यापूर्वी एक शस्त्रक्रिया झालेली पार्श्वभूमी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईतील मोठ्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी डॉ. देवसरकर यांनी एक डॉक्टर सोबत दिला आहे. आमदार जवळगावकर हे पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना झाले. आपल्या संपर्कातील लोकांनी क्वारंटाईन होऊन आपले स्वॅब तपासून घ्यावे असे आवाहन आमदार जवळगावकर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.