नांदेड - कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी व नागरिकांकडून नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या पथकाने २३हजार ३०० रुपयांचा दंड शुक्रवारी वसुली केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू करण्यात आल्या आहेत. मास्क न वापल्यामुळे आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे शहरातील विविध पथकांनी कारवाई केली आहे.
तरोडा सांगवीच्या पथकाने १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, पथक क्र.४ या वजिराबादच्या पथकाने १ हजार १०० रुपये, पथक क्र. ५ इतवारा पथकाने २ हजार ५०० रुपये, पथक क्र.६ सिडको पथकाने ५०० रुपयांचा तसेच संचारबंदी कालावधीत स्थापन करण्यात आलेले पथक क्र.३ व ४ यांनी २ हजार ४०० रुपयांच दंड वसूल केला आहे.
संचारबंदी काळात दुकाने चालू ठेवल्याने पथक क्र. १ तरोडा सांगवीने ७ हजार, पथक क्र. ३ गणेशनगरने सील केलेल्या दुकानाकडून ८ हजार ६०० असा एकूण २३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त विलास भोसीकर, उपआयुक्त सुधीर इंगोले यांच्या नियंत्रणाखाली सर्व सहा आयुक्त संजय जाधव, राजेश चव्हाण, प्रकाश गच्चे, डॉ.रईसोद्दीन, रावण सोनसळे व पथकातील कर्मचारी यांनी या मोहिमेत भाग घेतला.