नागपूर - निवडणुकीच्या तोंडावर नागपूर शहर पोलिसांनी तीन पिस्तुलांसह एका गुंडाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फिरोज उर्फ हाजी खान मोहम्मद जबिर असे आहे. तर, त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे कुठून आणली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी फिरोज याने फेब्रुवारी महिन्यात नागपूर शहरातील एका डॉक्टरला 50 लाखांची खंडणी मागण्यासाठी फोन केला होता. तेव्हापासूनच गुन्हे शाखेची त्याच्यावर नजर होती. आरोपी हा अवैध शस्त्र विक्रीच्या व्यवसायात सहभागी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचावर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. दरम्यान, आरोपी फिरोज हा निवडणुकीच्या तोंडावर शहरात अवैध शस्त्रांचा साठा घेऊन आल्याची गुप्त माहिती समजताच पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे.
हेही वाचा - माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या वाहनांच्या ताफ्यातील कारचा अपघात, तिघे जखमी
पोलिसांनी त्याच्या जवळून पिस्तूल, देशी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सोबतच आरोपीने इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र कुठून आणले याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे. यामध्ये अनेक मोठे गुन्हेगार सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, सदर आरोपी हा लातूर येथे झालेल्या 10 लाखांच्या दरोड्यातील आरोपी आहे.
हेही वाचा - काटोल विधानसभा: राष्ट्रवादीच्या देशमुखांना भाजपचे चरणसिंग ठाकूर देणार आव्हान?