मुंबई - बांद्रा रेल्वे टर्मिनसच्या ( Bandra Terminus ) तिकीट खिडकी जवळ असलेल्या कचऱ्याला ( Garbage fire ) आज सायंकाळी आग ( Garbage fire near Bandra Terminus ) लागली. या आगीवर मुंबई अग्नीशमन दलाने २० मिनिटात नियंत्रण मिळवले आहे. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
२० मिनिटात आगीवर नियंत्रण - बांद्रा टर्मिनस येथून मोठ्या प्रमाणात इतर राज्यात एक्स्प्रेस जातात. यामुळे नेहमीच येथे प्रवाशांची गर्दी असते. आज सायंकाळी ६.२५ च्या दरम्यान रेल्वे टर्मिनसच्या तिकीट खिडकी जवळ असलेल्या कचऱ्याला आग लागली. तिकीट खिडकी जवळ आग लागल्याने प्रवाशांची एकच पळापळ झाली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.
आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश- त्वरित अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. ६.४४ वाजता आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीवर अग्निशमन दालने केवळ २० मिनिटात नियंत्रण मिळवले. आगीत कोणीही जखमी झालेले नाही अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.