ETV Bharat / state

सामाजिक दायित्वाअंतर्गत शैक्षणिक सुविधांच्या विकासात योगदान द्या - मुख्यमंत्री

चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

mumbai
mumbai
author img

By

Published : Aug 6, 2021, 8:16 PM IST

मुंबई - चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

शालेय शिक्षण विभागातर्फे शासकीय शाळा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॉडेल स्कुल उपक्रमांतर्गत आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहेत. यासाठी राजर्षि छत्रपती शाहु महाराज शालेय शिक्षण परिवर्तन निधीअंतर्गत सामाजिक दायित्वातून सहभाग मिळवण्यासाठी विभाग प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला.

'रोटी-कपडा-मकानाबरोबर शिक्षणही महत्त्वाचे'

'रोटी, कपडा, मकान या मुलभूत गरजांबरोबर शिक्षणही अत्यावश्यक झाले आहे. ज्याला उत्तम शिक्षण मिळते तो स्वत:च्या क्षमतांवर रोटी, कपडा आणि मकानही मिळवू शकतो. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे. यामध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या सर्व प्रकारच्या म्हणजे प्रशिक्षण आणि साहित्य निर्मिती, ग्रंथालये, ई-अभ्यासक्रमाची निर्मिती, व्हर्च्युअल क्लासरुमची निर्मिती, शाळांचे संगणकीकरण, प्रशिक्षित तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासारख्या कार्यक्रमाबरोबर पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्येही सामाजिक दायित्वातून गुंतवणूक करता येणार आहे. कोणत्या क्षेत्रात ते काम करू इच्छितात, याची निवड ते पूर्णपणे आपल्या आवडीनुसार करू शकतात', असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. शासनाच्या सर्व शाळांमधून सर्वांना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

'आनंददायी शिक्षण पोहोचवणे शक्य'

'विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याच्या प्रयत्नातून २०१४ मध्ये मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता ८ वी ते १० वीचा अभ्यासक्रम एस.डी कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला. यासाठी उद्योजकांच्या सामाजिक दायित्व निधीची मोठी मदत झाली. सॅटेलाईटचा फुटप्रिंट खूप मोठा आहे. त्याद्वारे आपण दुर्गम भागात देखील सहजतेने पोहोचू शकतो हे स्पष्ट झाले. कोरोना काळात याचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवले. शाळांचे संगणकीकरण, व्हर्च्युअल क्लासरुमची निर्मिती यामध्ये सहभागी व्हावे. ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण अधिक आनंददायी आणि सुलभरित्या शिक्षणाची व्यवस्था करू', असेही ठाकरे म्हणाले.

'ज्योतसे ज्योत जलाते चलो'

'शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण विकासात आपण सर्वजण हातात हात घालून काम करू आणि ज्ञानाची ज्योत पेटवत ही ज्ञानगंगा अशीच प्रवाहित ठेऊ. सहकार्याच्या या ज्योतीला मशालीचे रुप देण्यासाठी एकत्र येऊन काम करूया. ज्ञानाच्या प्रकाशातून विद्यार्थ्यांच्या जीवनाची वाट उजळून टाकू. शिक्षणाबरोबर संस्कारित असणे अधिक महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी जगभरात कुठेही गेले तरी त्यांचे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर जोरदार स्वागत झाले पाहिजे, असा महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वजण मिळून आपण एकत्रित प्रयत्न करूया. त्यासाठी सहकार्य करा', असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सर्वांच्या सहकार्याने आदर्श शाळा – वर्षा गायकवाड

'राज्यातील शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सामाजिक दायित्व निधी अंतर्गत सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आदर्श शाळा निर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य करावे. यासाठी पहिल्या टप्प्यात ४७१ शाळा निवडण्यात आल्या आहेत. दरवर्षी ५०० शाळांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी एक वेबपोर्टल तयार करण्यात येत आहे. कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरु आहे. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही जीवनभरासाठी उपयुक्त ठरते. शिक्षणातील गुंतवणूक ही देशाच्या उभारणीतील गुंतवणूक असते. त्यामुळे देशाचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे', अशी अपेक्षा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.

सर्व शाळा आदर्श बनवणार - वंदना कृष्णा

'शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी उद्योजकांनी सामाजिक दायित्व अंतर्गत मदत करण्यासाठी पुढे यावे. राज्यातील सर्व शासकीय शाळांना टप्प्या टप्प्याने आदर्श शाळा बनवण्याचे नियोजन आहे. २०२५ पर्यंत राज्यातील ५००० शाळा आदर्श म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे', असे विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी म्हटले आहे.

40 संस्थांची उपस्थिती

कार्यक्रमात सहभागी झालेल्या उद्योजक, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि तज्ज्ञांनी उर्त्स्फुत सहभाग नोंदवत शासनासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट केले. तसेच ते कोणकोणत्या क्षेत्रात काम करू इच्छितात याविषयीच्या त्यांच्या अपेक्षाही त्यांनी सांगितल्या.
यावेळी स्वदेश फाउंडेशन, स्टरलाईट. जे एस डब्ल्यु, टाटा ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट, संपर्क फाउंडेशन,आर पी जी, रोटरीक्लब , एस बी आय, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आय सी आय सी आय बॅंक, एम ॲण्ड एम, फोर्ब्स मार्शल, बीपीसी एल, एमपॅथी फाउंडेशन, एडलवाईज, फीक्की यासारख्या 40 संस्थांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

हेही वाचा - लहान मुलांकरिता कोवोव्हॅक्स पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.