ETV Bharat / state

ED Inquiry: शिंदे गटात प्रवेश होताच 'या' नेत्यांची ईडी चौकशी बंद! वाचा, ईटीव्ही'चा खास रिपोर्ट

सक्त वसुली संचालनालयाने महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक आमदार खासदार आणि मंत्री यांना लक्ष करत विविध प्रकरणांचा ठपका ठेवीत चौकशी सुरू केली होती. मात्र, हे नेते शिंदे गटात सामील झाल्यानंतर या चौकशीचे पुढे काय झाले? या संदर्भातील सुनावणी न्यायालयात सुरू आहे. नेमके या नेत्यांवर काय आरोप होते आणि त्याची काय सद्यस्थिती त्या संदर्भात ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट.

As soon as Shinde joined the group, ED investigation of 'these' leaders was stop
शिंदे गटात प्रवेश होताच 'या' नेत्यांची ईडी चौकशी बंद
author img

By

Published : Dec 15, 2022, 7:27 PM IST

मुंबई - तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील अनेक आमदार खासदार यांच्यासह मंत्र्यांवर सक्त वसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. यातील अनेक नेत्यांना चौकशीसाठी समंसही बजावण्यात आले. मात्र, त्यानंतर राजकीय नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आणि सत्ता बदल झाला तोच या कायवाया शांत का झाल्या?. ज्यांच्या विरोधात ईडीने कारवाई करण्याचे समन्स बजावले होते ते नेते शिंदे गटात सामील झाले आणि पुढे समन्सवरील कारवाईचे काय झाले? हा सध्या प्रश्न आहे. या विरोधात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. त्यावरील सुनावणी सुरू आहे. मात्र, हे नेते कोण आहेत आणि त्यांच्यावर नेमके काय आरोप होते हे जाणून घेऊया.

हे नेते होते ईडीच्या रडारवर - शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी शिंदे गट स्थापन केला. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करुन राज्यात सत्तांतर घडवले. ईडीच्या रडारवर असलेल्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा आश्रय घेतला आणि कारवाई लांबवली. यापैकी प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जायचे, एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर होते. प्रताप सरनाईक यांची मालमत्ताही जप्त करण्यात आली होती. पण आता शिंदे गटात सामिल झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच, त्यांच्याबाबत आता किरीट सोमय्याही काहीही बोलत नाहीत.

जाधव दांपत्यावर कारवाई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्यावर शिवसेनेत असताना ईडीने आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला होता. काही महिन्यांपूर्वी आयकर विभागानेही जाधव यांच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारी केली होती, यात ३८ मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ईडीने मनी लॉण्ड्रींग प्रकरणी जाधव यांना चौकशीसीठी नोटीस बजावली. यशवंत जाधव यांची संपत्ती 138 कोटी इतकी होती, ती 300 कोटींच्या घरात पोहोचली, 24 महिन्यात त्यांनी 38 ठिकाणी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ते शिंदे गटात सामिल झाले आता कारवाई थांबलेली आहे.

भावना गवळी होत्या रडावर - वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळही ईडीच्या रडार वर होत्या. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोव्हेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणई भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान ईडीच्या अटकेत आहेत. त्यांची साडेतीन कोटी रूपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली होती. आता त्या शिंदे गटात आहेत. कारवाईही शांत आहे.

आडसूळही झाले बिनधास्त - शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनाही सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसुळांविरोधात तक्रार केली होती. मात्र, आडसूळ शिंदे गटात गेल्यानंतर आता राणा त्याबाबत काही बोलनत नाहीत आणि अडसुळांवरील करावाईही पुढे जाताना दिसत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.