ETV Bharat / state

निर्दयीपणाचा कळस: जळगावात शिकारीसाठी पिठात बॉम्बगोळ्यांचा वापर, चार कुत्र्यांचा मृत्यू

वन्यजीवांची शिकार करण्यासाठी शिकारी सक्रिय झाले आहेत. विद्यापीठ परिसरात प्राण्यांची शिकार करण्यासाठी पिठामध्ये बॉम्बगोळे ठेवून शिकार केली जात आहे.

author img

By

Published : Dec 24, 2020, 6:01 PM IST

जळगावात शिकारीसाठी पिठात बॉम्बगोळ्यांचा वापर

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. बिबट्या, मोरांसह विविध वन्यजीवांची नोंद या भागात झाली आहे. एकीकडे या भागात वन्यजीवांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न वनविभाग व विद्यापीठाकडून होत आहेत. तर दुसरीकडे वन्यजीवांची शिकार करण्यासाठी या भागात शिकारी सक्रिय झाले आहेत. विद्यापीठ परिसरात प्राण्यांची शिकार करण्यासाठी पिठामध्ये बॉम्बगोळे ठेवून शिकार केली जात आहे. यामुळे गेल्या आठ दिवसात चार कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या टेकड्यांवर वन्यजीवांचे वास्तव्य आहे. मागील काही दिवसांपूर्वी याठिकाणी बिबट्या देखील आढळला होता. यापूर्वी फास लावून आणि गिलोरीने वन्यजीवांची शिकार करण्याच्या घटना येथे घडत होत्या. विद्यापीठातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य सर्पमित्र अरुण सपकाळे, राजू सोनवणे आणि कर्मचारी यांनी नियमित गस्त घालून या घटनांवर आळा घालण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते. फासे लावून शिकार करता येत नाही, म्हणून आता थेट बॉम्ब गोळे पेरून शिकार करण्यापर्यंत शिकाऱ्यांची मजल गेली असल्याचे दिसून आले.

गेल्या ८ दिवसात ४ कुत्र्यांचा मृत्यू-

या परिसरात शेतीशिवार असल्याने रानडुक्कर देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या आणि इतर वन्यजीवांच्या शिकारीच्या उद्देशाने ठिकठिकाणी बॉम्बगोळे पेरून ठेवले जातात. त्या गोळ्यांना मांस देखील लावल्याचे दिसून येते. गेल्या आठ दिवसात याठिकाणी ब्लास्टमुळे ४ कुत्री व २ रानडुक्करांचा मृत्यू झाला आहे.

विद्यापीठ कर्मचारी वाचला, पण कुत्रा दगावला-

विद्यापीठ कर्मचारी मनोज भालेराव हे त्या परिसरात आपला पाळीव कुत्रा घेऊन भटकंतीसाठी गेले होते. फिरताना कुत्र्याने बॉम्ब गोळा तोंडात घेतला. गोळा खाऊ लागताच त्याचा स्फोट झाला. क्षणात कुत्र्याच्या जबड्याच्या चिंधड्या झाल्या. भालेराव यांच्या अंगावर देखील त्याचे अवशेष उडाले. ही घटना वन्यजीव संरक्षण संस्थेचे अरुण सपकाळे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांना माहिती दिली.

वनपालांना चौकशीचे आदेश-

जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांना या घटनेबद्दल माहिती देण्यात आल्यानंतर, वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई यांना पाहणी करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वनविभागाचे ज्ञानेश्वर देसाई, वनपाल आर. एस. ठाकरे व पद्मालय राऊंड स्टाफ, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अरुण सपकाळे, अमन गुजर, प्रा. किशोर पवार, सुभाष पवार, विठ्ठल धनगर, मनोज भालेराव, अरविंद गिरनारे, राजू सोनवणे, अमोल देशमुख, सुरेंद्र नारखेडे यांनी परिसरात शोध घेतला असता एक बॉम्ब गोळा आढळून आला. त्याला झाकून ठेवण्यात आले होते. या परिसरात अजून गोळे पेरून ठेवण्यात आल्याची शक्यता आहे.

शिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत-

मागील वर्षी हनुमान खोऱ्यात वनविभागाच्या परवानगीने लोकसहभागातून २५ लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचे बंधारे विकसित केले आहेत. त्यामुळे वन्यजीवांचा पाण्याच्या प्रश्न सुटल्याने त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पूर्वी मोर, ससे, लहान मोठे पक्षी यांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. त्यावर बऱ्यापैकी अंकुश होता. परंतु, आता थेट बॉम्ब गोळे पेरण्यापर्यंत शिकाऱ्यांची मजल गेली आहे. दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांनी केली.

हे तर अमानवीय कृत्य-

विद्यापीठ व हनुमान खोऱ्यात शिकार करणे कठीण झाल्याने, शिकाऱ्यांची अडचण वाढली आहे. त्यामुळे शिकाऱ्यांनी आपला मोर्चा खासगी जागेवर वळविला आहे. कोणाच्याही शेतात व खासगी प्लॉटमध्ये हे बॉम्बगोळे ठेवले जात आहेत. यामुळे वन्यजीवांप्रमाणेच नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. हे अमानवीय कृत्य असून, याबाबत पोलिसांनीही लक्ष घालण्याची गरज आहे, असे मत वन्यजीव संरक्षण संस्थेचे अरुण सपकाळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची डाव्या पक्षांसोबत आघाडी

हेही वाचा- खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्लीतून अटक, काय आहे पुणे कनेक्शन?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.