ETV Bharat / state

चिंताजनक : जळगाव जिल्ह्यात 983 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 6 जणांचा मृत्यू

जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री 4 हजार 243 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून 983 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 66 हजार 726 वर जाऊन पोहचली आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्याही सातत्याने वाढतच चालली आहे. बुधवारी जिल्ह्यातील 6 जणांचा बळी गेला.

author img

By

Published : Mar 10, 2021, 9:28 PM IST

jalgaon corona
जळगाव कोरोना

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता अधिकच वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल 983 नवे कोरोना पॉझिटिव्ह समोर आले. तर 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने समोर आलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठी आहे. परंतु, तपासणीसाठी पाठवलेल्या 4 हजार 243 अहवालांमधून मोठ्या संख्येने रुग्ण समोर आले आहेत, असा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे.

जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री 4 हजार 243 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून 983 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 66 हजार 726 वर जाऊन पोहचली आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्याही सातत्याने वाढतच चालली आहे. बुधवारी जिल्ह्यातील 6 जणांचा बळी गेला. म्हणून बळींची संख्याही वाढून 1 हजार 421 इतकी झाली. समाधानाची बाब म्हणजे, बुधवारी 441 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. आतापर्यंत 59 हजार 580 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरेच सचिन वझेंचे वकील - देवेंद्र फडणवीस

जळगाव शहरातील परिस्थिती अधिक गंभीर -

जळगाव हे शहर सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. याठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर आहे. बुधवारी देखील एकट्या जळगावात 222 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. त्याचप्रमाणे, चोपडा 133, जामनेर 163, चाळीसगाव 102 याठिकाणी देखील तीन आकडी संख्येने कोरोना पॉझिटिव्ह समोर आल्याने चिंता वाढली आहे.

ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 6 हजारांच्या उंबरठ्यावर -

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 6 हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 725 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात 1200 रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत, तर 4 हजार 525 रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत.

हेही वाचा - मनसुख हिरेन प्रकरण : सचिन वझेंचा शिवसेनेशी थेट संबंध नाही - मुख्यमंत्री ठाकरे

रिकव्हरी रेट घसरतोय -

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट देखील दिवसेंदिवस घसरत चालला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 89.29 टक्के इतका आहे. काही दिवसांपूर्वी हाच रेट 98 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील मृत्यूदर देखील चिंताजनक आहे. मृत्यूदर 2.36 टक्क्यांवर स्थिर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.