ETV Bharat / state

टँकरच्या धडकेत भाजप आमदाराच्या भावाचा मृत्यू

दत्तराव मुटकुळे यांना जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे मुटकुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर जाधव हे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते.  अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमीला उपचारासाठी जिल्हासमान्य रुग्णालयात तातडीने दाखल केले.

टँकरच्या धडकेत भाजप आमदाराच्या भावाचा मृत्यू
author img

By

Published : Apr 12, 2019, 11:00 AM IST

हिंगोली - हिंगोली येथील होंडा शोरूमजवळ पाण्याच्या टँकरची व दुचाकीची समोरा-समोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दत्तराव सखाराम मुटकुळे असे मृताचे नाव आहे. भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे मोठे बंधू होते. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

मृत दत्तराव मुटकुळे व जाधव हे दुचाकीने गावाकडे जात होते. दरम्यान, अकोला बायपासकडून शहरात येणाऱ्या पाण्याच्या टँकरची आणि मुटकुळे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दत्तराव मुटकुळे यांना जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे मुटकुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर जाधव हे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमीला उपचारासाठी जिल्हासमान्य रुग्णालयात तातडीने दाखल केले.

या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उशिरापर्यंत वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने वाहतूक सुरळीत केली. सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असल्याने आमदार तान्हाजी मुटकुळे हे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ सेनगाव येथे घेतलेल्या प्रचार सभेत होते. त्यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी ताबडतोब सभा सोडून हिंगोली येथे धाव घेतली. दत्तराव मुटकुळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणतीही नोंद झालेली नाही.

Intro:हिंगोली येथील होंडा शोरूम जवळ पाण्याच्या टँकरची व दुचाकीची समोरा समोर धडक होऊन दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. दत्तराव सखाराम मुटकुळे असे मयताचे नाव आहे. मयत भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे मोठे बंधू होते. ही घटना आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

Body:मयत दत्तराव मुटकुळे व जाधव हे दुचाकीने गावाकडे जात होते. दरम्यान, अकोला बायपास कडून शहरात येणाऱ्या पाण्याच्या टॅंकर ची अन दुचाकीची समोरा समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वरील दोघे जोराने जमिनीवर आदळले. यात दत्तराव मुटकुळे याना जबर मार लागल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त साचले होते तर जाधव हे जखमीअवस्थेत रस्त्यावर पडले होते. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. जखमीला उपचारासाठी जिल्हासमान्य रुग्णालयात तातडीने हलविले. या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उशिरापर्यंत वाहतुक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने वाहतुक सुरळीत केली.

Conclusion:सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असल्याने आमदार तान्हाजी मुटकुळे हे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ सेनगाव येथे घेतलेल्या प्रचार सभेत होते. त्यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी ताबडतोब सभा सोडून हिंगोली येथे धाव घेतली. दत्तराव मुटकुळे यांचा मूर्तदेह शवविच्छेदनासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात हलविला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणतीही नोंद झालेली नाही.

व्हिज्युअल ftp केले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.