ETV Bharat / state

गोंदिया : आईसह पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्यास छत्तीसगडमधून अटक; आमगाव पोलिसांची कारवाई

आरोपी २४ ऑक्टोबरला रात्रीला 11 वाजताच्या सुमारास मृत दोघींच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून घटनास्थळावरून पसार झाला होता. सकाळी हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीचा शोध सुरु केला होता. राजेश हा छत्तीसगड राज्यातील महासमुंद येथे आपल्या नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळताच आमगाव पोलिसांच्या एका चमूने महासमुंद येथे जाऊन आरोपीला अटक केली.

आईसह पत्नीची निर्घृण हत्या
author img

By

Published : Nov 9, 2019, 1:44 PM IST

गोंदिया - २४ ऑक्टोबरला रात्री आई आणि पत्नीची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या आरोपीला ७ नोव्हेंबरला छत्तीसगड राज्यातील महासमुंद येथून अटक केली आहे. आमगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजेश शालीकराम गजभिये (वय 40) असे आरोपीचे तर, आई आनंदाबाई शालीकराम गजभिये (वय 60) व पत्नी पूनम राजेश गजभिये (वय 32) अशी मृतांची नावे आहेत.

सुभाष चव्हाण, पोलीस निरीक्षक, आमगाव

आरोपी २४ ऑक्टोबरला रात्रीला 11 वाजताच्या सुमारास मृत दोघींच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून घटनास्थळावरून पसार झाला होता. सकाळी हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीचा शोध सुरु केला होता. आरोपीची दुचाकी आणि हेल्मेट मध्यप्रदेश येथील किरणापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बोरगाव येथे सापडली होती. पोलीसांनी न थांबता आरोपीचा शोध सुरू ठेवला.

हेही वाचा - लातुरात कीर्तनकाराचा खून की अपघात? खडगाव परिसरात खळबळ

दरम्यान, राजेश हा छत्तीसगड राज्यातील महासमुंद येथे आपल्या नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळताच आमगाव पोलिसांच्या एका चमूने महासमुंद येथे जाऊन आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आरोपीला ११ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास आमगाव पोलीस करत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395Date :- 09-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_09.nov.19_murder accused arrested_7204243
आई व पत्नीची निर्घृण हत्या करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात 
 छत्तीसगड येथून केली अटक 
Anchor:- २४ ऑक्टोबर रात्री आई व पत्नीची निर्घृण हत्या करून आरोपी पसार झालेला होता. मात्र सकाळी या हत्याची माहिती होताच पोलिसानी घटना स्थळी पंचनामा करत आरोपीचा शोध सुरु केला असुन पोलिसांनी जोमात तपास सुरु केला व आपले चक्र फिरवीत १५ दिवसात आरोपीला ७ नोव्हेंबर ला पहाटे ४ वाजे च्या जवळपास छत्तीसगड राज्यातील महासमुंद इथून अटक केली.
 VO :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या सुपलीपार येथे राहणारा आरोपी राजेश शालीकरांम गजभिये वय 40 वर्षे यानेआपल्या आई आनंदा बाई शालीकरांम गजभिये 60 वर्षे  व पत्नी पूनम राजेश गजभिये  32 वर्षे यांची २४ ऑक्टोबर रोजी रात्रीला 11 वाजे सुमारास झोपी गेल्यानंतर दोघांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करून ठार केला व घटना स्थळावरून पसार झाला होता. आमगाव पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास स्वतःच्या हातात घेत आपल्या ताफ्यासह तपास चक्र सुरू केले. असुन आरोपीची मोटारसायकल व हेल्मेट मध्यप्रदेश येथील किरणापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरगाव या गावात सापडली. परंतु आरोपीचा शोध लागला नव्हता. पोलीस न थांबता त्यांनी आरोपीची शोध मोहीम सुरू ठेवली. तेव्हा पोलिसांना पक्की माहिती  मिळाली की आरोपी राजेश गजभिये हा छत्तीसगड राज्यातील महासमुंद येथे आपल्या नातेवाईका कडे आहे अशी माहिती मिळताच आमगाव तेथील पोलिसांची चमू सह महासमुंद येथे जाऊन आरोपीला अटक केली. असुन  आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपीला ११ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी ने हे कृतयु कश्याला व का बर केला याची तपासणी आमगाव पोलीस करीत आहे. 
BYTE :- सुभाष चव्हाण  (पोलीस निरीक्षक, आमगाव)Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.