ETV Bharat / state

20 एप्रिलला लॉकडाऊन संपले? लोकांमध्ये गैरसमज, पोलिसांनी अडवून केले मार्गदर्शन

भामरागडात 22 मार्चपासून संचार बंदी आहे. 20 तारखेला लाकडाऊन संपले, असा त्यांना गैरसमज झाला. पुढील शासनाच्या निर्णयासंदर्भात येथील ग्रामीण भागात माहिती मिळाली नाही. याठिकाणी फोनसेवा नाही. यामुळे अशा तालुक्यातील 128 गावांतील 80 टक्के गावकऱ्यांना जगात काय होत आहे, याबद्दल माहिती नाही. हा भाग दुर्गम नक्षलग्रस्त आहे. अशा परिस्थितीत 20 एप्रिलला लॉकडाऊन संपले, या आशेने भामरागडकडे येऊ लागले. वाढती दुचाकींची गर्दी लक्षात येताच पोलीस विभाग प्रमुख एसडीपीओ, तहसीलदार आणि मुख्याधिकारी तातडीने भामरागड नगर प्रवेश नाक्याजवळ पोहोचले.

author img

By

Published : Apr 22, 2020, 11:31 AM IST

20 एप्रिलला लॉकडाऊन संपले; लोकांमध्ये गैरसमज, पोलिसांनी अडवून केले मार्गदर्शन

गडचिरोली - भामरागड तालुक्यातील नागरिक 20 एप्रिलला लॉकडाऊन संपला असा गैरसमज झाल्यानंतर भामरागडकडे मोठ्या संख्यने दुचाकीने निघाले होते. ही बाब लक्षात येताच येथील तहसीलदार सत्यनारायण सीलमवार, एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवणे आणि नगर पंचायत मुख्याधिकारी सुरज जाधव यांनी तातडीने त्यांना थांबवण्याचा निर्णय घेतला. नागरिक पर्लकोटा नदीजवळ दाखल झाले असता, प्रत्येकाचे वाहन थांबवण्यात आले. तसेच त्यांचा गैरसमज दूर करून 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार असल्या संदर्भात मार्गदर्शन केले.

भामरागडात 22 मार्चपासून संचार बंदी आहे. 20 तारखेला लॉकडाऊन संपले, असा त्यांना गैरसमज झाला. पुढील शासनाच्या निर्णयासंदर्भात येथील ग्रामीण भागात माहिती मिळाली नाही. याठिकाणी फोनसेवा नाही. यामुळे अशा तालुक्यातील 128 गावातील 80 टक्के गावकऱ्यांना जगात काय होत आहे, याबद्दल माहिती नाही. हा भाग दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. अशा परिस्थितीत 20 एप्रिलला लॉकडाऊन संपले, या आशेने भामरागडकडे येऊ लागले. वाढती दुचाकींची गर्दी लक्षात येताच पोलीस विभाग प्रमुख एसडीपीओ, तहसीलदार आणि मुख्याधिकारी तातडीने भामरागड नगर प्रवेश नाक्याजवळ पोहोचले.

हेही वाचा - मुंबई-पुणे भागातील लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या सर्वांना तिथेच थांबवून चौकशी अंती त्यांची नावे यावेळी लिहून घेण्यात आली. तसेच या स्वर्वांनी स्वतःची आरोग्य तपासणी केली की नाही? गावातील परिस्थिती याबाबत सखोल चौकशी करण्यात आली. यानंतर यासर्वांना सोडण्यात आले.

महसूल पोलीस आणि नगर पंचायत टीम अतिदक्षतेने काम करत आहे. एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ठाणेदार संदीप भांड आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत. तर 'आमचा तालुका सुरक्षित, आम्ही सुरक्षित' असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.