ETV Bharat / state

Aurangabad Jandhan Account : जनधन खात्यात 15 लाख! मात्र पैसे करावे लागणार परत

पैठण तालुक्यातील शेतकऱ्याच्या जनधन खात्यात 15 लाख ( 15 lakh deposite in Farmer Account ) जमा झाले. पंतप्रधानानी आपला शब्द पाळाला, अस त्याला वाटल त्याने त्यांचे आभार मानले, पण नंतर त्याच्यावरच पैसे परत करण्याची नामुष्की ओढवली आहे.

15 lakh deposited in Jandhan account
15 lakh deposited in Jandhan account
author img

By

Published : Feb 8, 2022, 10:47 AM IST

Updated : Feb 9, 2022, 4:23 AM IST

औरंगाबाद - प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या आधी दिले. त्यावरून अनेक वेळा टीका झाली. मात्र, पैठण तालुक्यातील शेतकऱ्याच्या जनधन खात्यात 15 लाख ( 15 lakh deposite in Farmer Account ) जमा झाले. पंतप्रधानानी आपला शब्द पाळाला, अस त्याला वाटल त्याने त्यांचे आभार मानले, पण नंतर त्याच्यावरच पैसे परत करण्याची नामुष्की ओढवली आहे.

प्रतिक्रिया

शेतकऱ्याने मानले आभार

पैठण तालुक्यातील दावरवाडीतील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्धन औटे यांच्या, बँक ऑफ बडौदाच्या जनधन खात्यावर 17 ऑगस्ट 2021 रोजी 15 लाख 34 हजार रुपए जमा झाले. (15 lakh was deposited in Jandhan account) पैसे जमा झाल्यावर पाहिले काय कराव सुचत नव्हते. पैसे कसे आले असे अनेक प्रश्न पडले. मात्र हे पैसे पंतप्रधान मोदींनी मोदी यांनी पाठवले अस त्याला वाटल. जनधन मध्ये पैसे आले तर चर्चा तर होणारच, मग काय अनेकांनी ज्ञानेश्वर यांचे अभिनंदन केलं. तर ज्ञानेश्वर यांनी पंतप्रधान कार्यालयाला मेल करत आभार मानले.

आनंदावर पडले पाणी

जनधन योजनेचे पैसे आल्याने ज्ञानेश्वर यांनी 9 लाख रुपये खर्च करून घर बांधलं. इतर पैशांचं नियोजन सुरु असतानाच ग्रामपंचायतने धक्का दिला. पिंपळवाडी ग्रामपंचायतला जिल्हा परिषद कडून मिळणारे 15 व्या वित्त आयोगाचे पैसे खात्यावर न येता ते पैसे औटे यांच्या खात्यावर जमा झाल्याच 4 महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला लक्षात आल. आता ग्रामपंचायतीने ज्ञानेश्वर यांना पैसे परत करण्यासाठी पत्र पाठवले. पैसे खर्च झाल्याने ते परत कसे करणार असा प्रश्न पडल्याने त्यांची चिंता वाढली आहे. खर्च केल्यावर उरलेले 6 लाख परत करता येतील मात्र घर बांधण्यासाठी वापरलेले पैसे कसे आणायचे अशी समस्या ज्ञानेश्वर यांच्या समोर आहे.

हेही वाचा - शिवाजी पार्क येथे लतादीदींचे स्मारक उभारण्याच्या चर्चेमुळे रंगले राजकारण

Last Updated : Feb 9, 2022, 4:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.