ETV Bharat / state

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाहनाचा अपघात; पदाधिकारी किरकोळ जखमी

author img

By

Published : Oct 27, 2020, 1:16 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आणण्याचा प्रयत्न करत असते. यासाठी संघटनेचे पदाधिकारी नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत असतात. शेवगाव तालुक्यातून संघटनेचे काही पदाधिकारी उर्जा राज्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

Accident
अपघात

अहमदनगर - ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी काल शेवगाववरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक शिष्टमंडळ गेले होते. त्यांच्या वाहनाला नगर-औरंगाबाद रोडवरील घोडेगावजवळ अपघात झाला. या अपघातात गाडीतील पदाधिकारी किरकोळ जखमी झाले.

पाठीमागून येणाऱ्या वाहनाने दिली धडक -

शेवगाव तालुक्यातील अमरापुर, फलकेवाडी, भगूर या भागातील शेतकऱ्यांना घेऊन हे शिष्टमंडळ राहुरीला गेले होते. तालुक्यातील विजेच्या प्रश्नावर चर्चा करून हे शिष्टमंडळ शेवगावच्या दिशेने येत असताना घोडेगावजवळ पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेमुळे पदाधिकाऱ्यांना मुकामार बसला. यावेळी वाहनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, तालुका पक्ष अध्यक्ष प्रवीण मस्के, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, मेजर अशोक भोसले, अमोल देवढे हे होते.

शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने बचावलो -

शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच आम्ही या अपघातातून बचावलो. असेच आशीर्वाद पुढील काळातही आमच्या मागे असू द्या. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आणि त्यांना न्याय देण्यासाठी कायम बांधील आहोत, असे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांनी सांगितले.

उर्जा राज्यमंत्री घेणार आढावा बैठक -

प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांचे व विजेचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. पुढील आठवड्यामध्ये शेवगाव तालुक्याची आढावा बैठक घेणार असल्याचे तनपुरे यांनी या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.