ETV Bharat / sports

दक्षिण आशियाई स्पर्धा : सहाव्या दिवशी कुस्तीमध्ये भारताला ४ सुवर्णपदके

author img

By

Published : Dec 8, 2019, 1:49 PM IST

या कामगिरीमुळे कुस्तीमध्ये भारताने स्पर्धेत आत्तापर्यंत आठ सुवर्णपदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक जिंकणाऱ्या कादियानने पाकिस्तानच्या ताबीयार खानला १०-१ असे पराभूत केले.

4 indian wrestler won gold medal in south asian games
दक्षिण आशियाई स्पर्धा : सहाव्या दिवशी कुस्तीमध्ये भारताला ४ सुवर्णपदके

काठमांडू - येथे सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने कुस्तीमध्ये ४ सुवर्णपदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियानने पाकिस्तानच्या ताबीयार खानला पराभूत केले. सत्यव्रतशिवाय गुरशरणप्रीत कौर, सुमित मलिक आणि सरिता मोरे यांनीही भारतासाठी सुवर्णपदक जिंकली आहेत.

हेही वाचा - कितनी बार बोला था विराट को मत छेड.., बिग बींच्या 'त्या' ट्विटवर विराटचे उत्तर

या कामगिरीमुळे कुस्तीमध्ये भारताने स्पर्धेत आत्तापर्यंत आठ सुवर्णपदके जिंकली आहेत. सत्यवर्त कादियानने पुरुषांच्या ९७ किलो फ्रीस्टाइल, सुमित मलिकने पुरुषांच्या १२५ किलो फ्रीस्टाइल, गुरशरणप्रीत कौरने महिलांच्या ७६ किलो आणि सरिता मोर हिने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात ही कामगिरी केली.

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक जिंकणाऱ्या कादियानने पाकिस्तानच्या ताबीयार खानला १०-१ असे पराभूत केले. सात वर्षांनंतर पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणारी गुरशरणप्रीतने महिलांच्या ७६ किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्याला १०-० अशी मात दिली आहे.

Intro:Body:

दक्षिण आशियाई स्पर्धा :  सहाव्या दिवशी कुस्तीमध्ये भारताला ४ सुवर्णपदके

काठमांडू - येथे सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने कुस्तीमध्ये ४ सुवर्णपदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियानने पाकिस्तानच्या ताबीयार खानला पराभूत केले. सत्यव्रतशिवाय गुरशरणप्रीत कौर, सुमित मलिक आणि सरिता मोरे यांनीही भारतासाठी सुवर्णपदक जिंकली आहेत.

हेही वाचा -

या कामगिरीमुळे कुस्तीमध्ये भारताने स्पर्धेत आत्तापर्यंत आठ सुवर्णपदके जिंकली आहेत. सत्यवर्त कादियानने पुरुषांच्या ९७ किलो फ्रीस्टाइल, सुमित मलिकने पुरुषांच्या १२५ किलो फ्रीस्टाइल, गुरशरणप्रीत कौरने महिलांच्या ७६ किलो आणि सरिता मोर हिने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात ही कामगिरी केली.

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक जिंकणाऱ्या कादियानने पाकिस्तानच्या ताबीयार खानला १०-१ असे पराभूत केले. सात वर्षांनंतर पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणारी गुरशरणप्रीतने महिलांच्या ७६ किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्याला १०-० अशी मात दिली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.