ETV Bharat / sports

चेन्नईत होणार पी. व्ही. सिंधू बॅडमिंटन अकादमी

ही अकादमी चेन्नईच्या कोलापक्कम येथील ओमेगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये उभारली जाईल. यात शालेय विद्यार्थ्यांव्यतिरिक्त बॅडमिंटनमध्ये रस असणाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाईल.

author img

By

Published : Feb 19, 2020, 9:20 PM IST

PV Sindhu Badminton Academy to open in Chennai
चेन्नईत होणार पी. व्ही. सिंधू बॅडमिंटन अकादमी

नवी दिल्ली - भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हिच्या नावाने लवकरच एक अकादमी सुरू केली जाणार आहे. हर्टफुलनेस इन्स्टिट्यूटने चेन्नईत पी. व्ही. सिंधू बॅडमिंटन अकादमी आणि स्टेडियम उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांत ही अकादमी तयार होईल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा - आयपीएलपेक्षा ६ पटीने कमी आहे पाकिस्तानच्या टी-२० लीगच्या बक्षीसाची रक्कम!

ही अकादमी चेन्नईच्या कोलापक्कम येथील ओमेगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये उभारली जाईल. यात शालेय विद्यार्थ्यांव्यतिरिक्त बॅडमिंटनमध्ये रस असणाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाईल. या अकादमीत आठ कोर्ट असून त्यांची बांधणी सर्वोत्कृष्ट असेल. या स्टेडियममध्ये १००० लोकांसाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे. याशिवाय या अकादमीमध्ये जिम आणि फिजिओ सेंटरही असेल.

'माझ्या नावाने ही अकादमी होत असल्याचा मला अभिमान वाटतो. स्पर्धेची पातळी अत्यंत आव्हानात्मक आहे आणि एखाद्या खेळाडूला केवळ शारीरिकच नव्हे तर भावनिक आणि मानसिकदृष्ट्या देखील तंदुरुस्त असणे आवश्यक आहे', असे सिंधूने याप्रसंगी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.