ETV Bharat / sitara

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यावरच चित्रीकरणासाठी परवानगी देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात चित्रीकरणावर बंदी आणण्यात आली. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे.

author img

By

Published : Jun 7, 2021, 10:27 AM IST

cm udhhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यावरच मुंबईत चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. चित्रपट आणि टीव्ही उद्योगाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री ठाकरेंसोबत ऑनलाइनच्या माध्यमातून बैठक झाली.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन -

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात चित्रीकरणावर बंदी आणण्यात आली. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, चित्रपट आणि टीव्ही निर्मात्यांना चित्रकरणादरम्यान, कोरोनाच्या नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे. सोबतच मनोरंजन क्षेत्राने अनलॉक प्रक्रियेदरम्यान सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा - पेट्रोल दरवाढी विरोधात उद्यापासून काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन - नाना पटोले

बैठकीला कोण उपस्थित -

दरम्यान, या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या ऑनलाइन बैठकीला, आदेश बांदेकर, नितिन वैद्य, प्रशांत दामले, भरत जाधव, सुबोध भावे, अमोल कोल्हे, अमित बहल, पुनीत गोयनका, अजय भालवंकर, संगमोन शिर्के और सिद्धार्थ राय कपूर यांच्यासोबतच अनेक अभिनेते आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.