ETV Bharat / sitara

रामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने नातवंडांसोबत पाहिले 'रामायण'

या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी देखील आपल्या नातवंडांसोबत मालिकेचा भाग पहिला आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

author img

By

Published : Mar 31, 2020, 9:05 AM IST

Arun Govil watch Ramayan with his Grandchildrens, photo goes viral
रामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने नातवंडांसोबत पाहिले 'रामायण'

मुंबई - रामानंद सागर लिखित आणि दिग्दर्शित 'रामायण' ही मालिका पुन्हा एकदा टी. व्ही वर सुरू झाली आहे. सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवस टाळेबंदी करण्यात आली असल्यामुळे नागरिकांना विरंगुळा मिळावा या उद्देशाने 'रामायण' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी देखील आपल्या नातवंडांसोबत मालिकेचा भाग पहिला आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या मालिकेविषयी अरुण गोवील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ' या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या पिढीला जुन्या काळातील अभिनेत्याचा अभिनय आणि पौराणिक मालिका पाहण्याची संधी मिळतेय. तसेच या मालिकेतून मूल्यांची देखील शिकवण मिळते. त्यामुळे सर्वांना ही मालिका जोडून ठेवते.'

'जर मालिका पाहताना त्यांना काही अडचणी आल्या किंवा काही गोष्टी समजल्या नाहीत तर घरातील ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या शंका दूर करू शकतात. हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे त्यामुळे आता सर्वांना वेळ मिळालाच आहे तर या संधीचा फायदा घ्या, असेही ते पुढे म्हणाले.
1987-88 च्या दशकात रामायण मालिका प्रसारित झाली होती. रामानंद सागर यांनीच या मालिकेचे लेखन, दिग्दर्शन केले होते. अरुण गोवील यांच्यासोबत दीपिका चिखलिया यांनी सीता ही भूमिका साकारली होती. अरुण त्रिवेदी हे रावणाच्या भूमिकेत दिसले होते. तर, दारा सिंग यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.