ETV Bharat / sitara

सोशल मीडियावर दीपिका पुन्हा ट्रोल, आता 'हा' टीकटॉक व्हिडिओ होतोय व्हायरल

दीपिकाला पुन्हा ट्रोल करण्यामागचं कारण म्हणजे तिने शेअर केलेला एक टीकटॉक व्हिडिओ सध्या फार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिकाने 'छपाक'च्या लुकचे चॅलेंज दिले आहे. याचमुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

author img

By

Published : Jan 19, 2020, 1:51 PM IST

deepika Padukon Troll after her chaapaak look  tik tok challenge, deepika Padukon troll on social media, Social Media Users troll deepika, दीपिका पुन्हा ट्रोल, छपाक लुक चॅलेंजमुळे दीपिका सोशल मीडियावर ट्रोल, deepika Padukon latest news, deepika Padukon
सोशल मीडियावर दीपिका पुन्हा ट्रोल, आता 'हा' टीकटॉक व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोण अलिकडेच 'छपाक' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बरेच वादविवादही निर्माण झाले होते. दीपिकाने जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर तिच्यावर बरीच टीका झाली. सोशल मीडियावर तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं. आता पुन्हा एकदा दीपिकाला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

दीपिकाला पुन्हा ट्रोल करण्यामागचं कारण म्हणजे तिने शेअर केलेला एक टीकटॉक व्हिडिओ सध्या फार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिकाने 'छपाक'च्या लुकचे चॅलेंज दिले आहे. याचमुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

हेही वाचा -'असा' होता दीपिकाचा 'मालती' बनण्यापर्यंतचा प्रवास...

दीपिकाने मेकअप आर्टिस्ट फॅबी हिला तिच्या जवळच्या तीन भूमिकांमधील लुक साकारण्याचे चॅलेंज दिले होते. यामध्ये 'ओम शांती ओम', 'पिकु' आणि 'छपाक' या ३ चित्रपटातील लुकचा समावेश होता. दीपिकाला या ३ भूमिका तिच्या खूप जवळच्या असल्यामुळे तिने हे चॅलेंज फॅबीला दिले. मात्र, हा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत.

एका युजरने दीपिकाचा हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे, की 'आणि आम्ही विचार केला होता, की दीपिका जेएनयूमध्ये आपल्या पीआर स्टंट्समुळे लक्ष्मीची खिल्ली उडवणार नाही. आता ती अ‌ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या पीडित तरुणींच्या लुकवर टिकटॉक चॅलेंज घेऊन आली आहे. कमाल आहे.'

आणखी एका युजरने लिहिलेय, की 'हे कल्पनेच्या पलिकडचे आहे. अशाप्रकारे अ‌ॅसिड हल्ला पीडीतांची खिल्ली नाही उडवली पाहिजे. दीपिकाने यासंबधी माफी मागावी'.

  • Telling you this as the son of an acid attack victim: @deepikapadukone you are one sick human being. My mother had to undergo years of surgery & emotional trauma. The victims are strong & beautiful, your commercialisation of their suffering is disgustingpic.twitter.com/2tOvkJqyU9

    — Abhijit Iyer-Mitra (@Iyervval) January 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -'छपाक' टीमने केला अॅसिड विक्रिचा पर्दापाश, दीपिकाने शेअर केला व्हिडिओ

'आपल्या जखमांना घेऊन चालणं, हा कोणता लुक होऊ शकत नाही. अ‌ॅसिड हल्ला पीडिता हा काही लुक होऊ शकत नाही', असेही काही जणांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.