ETV Bharat / sitara

'आम्ही हे करुन दाखवलं, पापा..!' रितेशची भावूक पोस्ट

अमित देशमुख आणि धीरज देशमुख या दोन्ही भावांनी लातूरची विधानसभा जिंकली आहे. रितेश देशमुखने या बंधूंचा जोरदार प्रचार केला होता. विजय मिळाल्यानंतर रितेशने भावूक होऊन वडिलांना आम्ही हे करुन दाखवलं, असे म्हटले आहे.

author img

By

Published : Oct 25, 2019, 12:47 PM IST

रितेश देशमुख

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विलासराव देशमुख कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हासू पाहायला मिळाले. लातूर शहर आणि ग्रामीण अशा दोन मतदार संघात विलारावांचे दोन सुपुत्र निवडणूक लढवीत होते. या बंधूंच्या प्रचारासाठी रितेश देशमुखनेही कंबर कसली होती. दोन्ही भाऊ विजय झाल्यानंतर रितेशने लातूरकरांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख यांनी यंदाची विधानसभा लातूर शहरातून लढवली. ४२ हजार मतांनी त्यांना जनतेने जिंकवले. लातूर ग्रामीणमधून विलासरावांचे धाकले चिरंजीव धीरज देशमुख लढत होते. त्यांचाही तब्बल १ लाख २० हजार मतांनी विजय झाला.

देशमुख बंधूंच्या या निवडणुकीत रितेश देशमुखने प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती. माझे भाऊ हे तुमचेही भाऊ आहेत, त्यांना विजयी करा अशी हाक त्याने दिली होती. विलासरावांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या लातूरकरांनी त्यांच्या दोन्ही मुलांवरही भरपूर प्रेम केले आणि त्यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर केला.

रितेश देशमुखने लातूरच्या दोन्ही मतदार संघातील जनतेचे आभार मानले आहे. त्यासोबतच वडिलांची आठवण काढत त्याने 'पापा, आम्ही हे करुन दाखवलं.', असे ट्विट केले आहे. रितेशच्या या पोस्टवर देशमुख बंधुंच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Intro:Body:

entertainment

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.