मुंबई - बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या अफेअरची चर्चा सुरू होती. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन आणि मलायकाच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा थेट लग्नापर्यंतदेखील पोहोचल्या होत्या. दोघांनी कधीच त्याचं प्रेम जगासमोर मान्य केलं नव्हतं. मात्र, अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने पहिल्यांदाच अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली आहे.
अर्जुन कपूरचा २६ जुलैला वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने दोघांचाही न्युयॉर्क येथील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.
- View this post on Instagram
Happy bday my crazy,insanely funny n amazing @arjunkapoor ... love n happiness always
">
अर्जुन-मलायका नेहमी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. मात्र, दोघांनीही एकमेकांसोबतचे फोटो आत्तापर्यंत शेअर केले नव्हते. आता मलायकाने अर्जुनसोबतचा फोटो शेअर करून अप्रत्यक्षरित्या त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. यावर आता अर्जुन काय प्रतिक्रिया देणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.