सोलापूर - गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला. हा अपघात मैनदर्गी महार्गावर असलेल्या कठड्यावर वळण घेताना रविवारी सकाळी एसटी बस पलटी झाली. रुग्णवाहिका चालक भालशंकर हे त्याच मार्गावरून जाताना त्यांना ताबडतोब कॉल आला. अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी होऊन ही मोठी दुर्घटना घडली.
70 प्रवाशी करत होते प्रवास : बसमध्ये जवळपास 70 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 प्रवाशी हे गंभीर जखमी झाले आहेत. अंबुलन्स चालक भाळशंकर व त्यांच्या सोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी या सर्व प्रवाशांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आणि प्रथमोपचार करून त्यांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे जखमी 30 प्रवाशांची नोंद झाली आहे.
जखमी प्रवाशांची नावे : सुजाता पोपट पेडगावकर (वय 45,रा.जामखेड अहमदनगर), गुरुराज लक्ष्मण कुलकर्णी(वय 45 सोलापूर), आनंदीबाई घटने (वय 56 ,रा रामपूर), वर्षा वडगावकर (वय 35 रा सोलापूर), शेखर संजय वडगावकर (वय 47,रा सोलापूर), ओंकार पेडगावकर (वय 16,रा जामखेड,अहमदनगर), जावेद बागवान (वय 33 रा मेदरगी ता अक्कलकोट),मल्लया हिरेमठ (वय 60 रा अक्कलकोट), मंगल इरय्या देशमुख(वय 76 ,रा सोलापूर), इरय्या शरणय्या देशमुख (वय 40,रा सोलापूर), शंकर राठोड (वय 35,सोलापूर), शोभा रमेश जाधव (वय 55,रा मुंबई), राहुल रमेश जाधव वय 30,रा मुंबई), रत्नाबाई मडप्पा मडचने (वय 60 वर्ष,रा.नावडग), समीक्षा संगमेश्वर पाटील(वय 14 रा सोलापूर), भाऊसाहेब यादवराव पाटील (वय 50 रा सोलापूर), मीना मुकुंद गायकवाड(वय 48 रा सोलापूर), देविदास परदेशी (वय 50,रा आळंद,जि गुलबर्गा),शशिकांत आंदोडगी (वय 70,रा अक्कलकोट), गणेश हिरजा(वय 19,रा सोलापूर), संगीता संगमेश्वर पाटील (वय 36,रा,जेऊर ता अक्कलकोट), शिवशरण बिराजदार (वय 58 वर्ष ,रा सोलापूर), सलीम हसनकडोंगी(वय 45 ,अक्कलकोट), सुयोग साळुंखे(वय 27 ,सांगली), शशिकांत कटारे (वय 55,रा हसापूर), मंजुषा सूर्यकांत (वय 40 वर्ष,रा नागन सूर ता अक्कलकोट), मंगल रश्मी(वय 60 ,रा सोलापूर), अमृता तांनवडे (वय 33 रा पुणे) अशा तीस प्रवाशांची माहिती अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दिली आहे.
...म्हणून रुग्णांना हलविले सोलापुरात : अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक राठोड हे राहावयास सोलापूर शहरात आहेत. आज रविवार असल्याने ते सोलापूर शहरातील घरी होते. रुग्णालयात फक्त डॉ उपाध्ये आणि नर्स चव्हाण या उपस्थित होत्या. रुग्णवाहिका चालक, नर्स आणि उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सर्व प्रवाशी रुग्णांना पेन किलरचे इंजेक्शन दिले आणि जखमी रुग्णांची ड्रेसिंग केली आणि सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. अपघाताची माहिती मिळताच डॉ अशोक राठोड हे आपल्या खासगी वाहनांतून अक्कलकोटकडे रवाना झाले. काही जखमी प्रवाशी अक्कलकोट येथील रुग्णालयात येथे होते. काही वेळाने त्यांना देखील सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
जिल्हाधिकारी तळठोकून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये : या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक राठोड यांच्याशी संपर्क साधला. रुग्णांवर झालेल्या उपचाराची माहिती घेतली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे देखील तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तळठोकून बसले आहेत.
हेही वाचा - Video : सिमेंटचा ट्रक चोरण्याचा केला प्रयत्न.. कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडून दिला जोरदार चोप.. सहा जणांना अटक