ETV Bharat / city

आरएसएसची आरक्षणविषयक भूमिका निवडणुकीच्या तोंडावर - हरी नरके

author img

By

Published : Aug 15, 2021, 11:05 AM IST

Updated : Aug 15, 2021, 11:21 AM IST

दलित विषयक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आरक्षणवादी आहेत हे लक्षात ठेवून त्यांना खुश करण्यासाठी होसबळे बोलले. यामुळे ती भूमिका प्रामाणिकपणाची वाटत नसल्याचे हरी नरके म्हणाले.

हरी नरके
हरी नरके

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका ही उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडवर घेतली भूमिका असल्याची टीका ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांनी केली. ते नागपुरात महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेनंतर पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा - 'हाफ चड्डी घालून नागपुरातून भाषण देणे म्हणजे राष्ट्रवाद नव्हे'

'आरएसएसची मूळ भूमिका आरक्षणमुक्त भारताची'

दलित विषयक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आरक्षणवादी आहेत हे लक्षात ठेवून त्यांना खुश करण्यासाठी होसबळे बोलले. यामुळे ती भूमिका प्रामाणिकपणाची वाटत नसल्याचे हरी नरके म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास पाहता त्यांची भूमिका आरक्षणमुक्त भारत आहे. यात होसबळे यांनी मांडलेली भूमिका ही आरएसएसने जर भूमिका बदलली असेल तर त्यासाठी त्यांनी जनतेची माफी मागायला पाहिजे. आतापर्यंत आमची आरक्षण विरोधी भूमिका होती. त्याबद्दल आम्ही देशाची माफी मागतो आणि आमच्या भूमिकेत आम्ही बदल करत आहोत, असे सांगावे. पण त्यांनी तसे केले नाही, म्हणजेच त्यांची भूमिकाही आरक्षणविरोधी आहे, असेही नरके म्हणाले.

हेही वाचा - भाजप व आरएसएस ओबीसी आरक्षणाचे मारेकरी - भानुदास माळी

'उत्तर प्रदेशचा होणार प. बंगाल'

उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. मोदींच्या भाजपा सरकारची 5 वर्षांची लोकप्रियता उधळणीला लागली आहे. तर उत्तर प्रदेशात योगी सरकारने बट्ट्याबोळ करून ठेवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प. बंगाल होणार आहे. प्रतिमा सुधारण्यासाठी डागडुजीचे काम सुरू असल्याचेही नरके म्हणाले.

Last Updated : Aug 15, 2021, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.