ETV Bharat / city

महाआघाडी सरकारविरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल - प्रवीण दरेकर

या सरकारांमध्ये तिन्ही पक्षांची एक वाक्यता नाही त्यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यास हे सरकार कमी पडत आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्हाला या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 26, 2021, 4:43 PM IST

मुंबई - सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमधील दोन नवीन कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. कांदिवली येथील भुलाबाई आरोग्य भवन सेंटर व नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथील रवींद्र जोशी फाउंडेशन व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम आज पार पडला. त्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे सरकार फक्त भ्रष्टाचार करण्यात माहीर आहे. या सरकारांमध्ये तिन्ही पक्षांची एक वाक्यता नाही त्यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यास हे सरकार कमी पडत आहे, त्यामुळे आम्हाला आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रस्त्यावरती उतरावे लागत आहे.

ठाकरे सरकार कोरोना वर मात करण्यात कमी पडत आहे रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे कुठे खुर्चीवर, तर कुठे गाडीमध्ये,जमिनीवरून रुग्णांना ऑक्सीजन लावण्यात येत आहे म्हणूनच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्व जण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करत आहोत असे राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात व मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य सरकार मात्र फक्त केंद्रावर टीका करण्यात व्यस्त आहे. एकीकडे सरकार वर केवळ आरोप करण्यात व्यस्त असताना आपल्या सारखे जनतेचे खरे प्रतिनिधी अहोरात्र मेहनत करून वेगवेगळ्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देत आहे. मेहनत करून लवकरात लवकर राज्याला व पर्यायाने देशाला आपण कोरोना मुक्त करुया असा विश्वास देखील यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.