मुंबई श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमात आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी पोलिसांना धमकीवजा इशारा (Warning to police) दिला होता. महाराष्ट्रात हिंदूत्ववादी सरकार आहे. हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने लक्षात ठेवावं. कोणताही अधिकारी हिंदू मुलावर वाकड्या नजरेने बघेल त्याचे डोळे, जाग्यावर राहणार नाहीत. असे नितेश राणे म्हणाले होते. नितेश राणेंच्या पोलिसांबद्दलच्या वक्तव्याचा निषेध असीम सरोदे (adv Aseem sarode) यांनी निषेध केला आहे.
नितेश राणेंचा निषेध नितेश राणे कायदा सुव्यवस्था पाळत नाहीत. पोलिसांबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था मोडत असेल तर सर्वसामान्यांना न्याय कधी मिळणार. त्यामुळे, पोलीस यंत्रणेवरती कुठलाही राजकीय दबाव नसेल तर पोलीस सर्वसामान्यांचे काम करू शकतील असं यावेळी असीम सरोदे यांनी सांगितलं.
हिंदू जन आक्रोश आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हिंदू, लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि आदिवासी तरूणाच्या अपहरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. तर देवेंद्र फडणवीसांच्या उल्लेखावरून ते म्हणाले, की नवाब मलिक 93च्या बॉम्बस्फोटातील लोकांसोबत व्यवहार करतायत. दुसरीकडे, हिंदुंचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. मग त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला हरकत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्यात चुकीचे काय, असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी श्रीरामपूर येथील मोर्चात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुह्दयसम्राट असा उल्लेख केला. यावर देखील वाद निर्माण झाला आहे.