मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात 25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661 रुग्ण आढळुन आले होते. काल 7 नोव्हेंबरला त्यात किंचित वाढ होऊन 892 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज पुन्हा 8 नोव्हेंबरला किंचित घट होऊन 751 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 15 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 1,555 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.62 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
13,649 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 751 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 18 हजार 347 वर पोहचला आहे. तर आज 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 403 वर पोहचला आहे. आज 1,555 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 60 हजार 663 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.62 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 33 लाख 2 हजार 489 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.46 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 38 हजार 179 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 13 हजार 649 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत घट -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15 मृत्यूंची नोंद झाली आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 206
कल्याण डोंबिवली पालिका - 55
अहमदनगर - 46
पुणे - 70
पुणे पालिका - 51