ETV Bharat / city

विधानपरिषद निवडणूक 2021: सतेज पाटील बदला घेणार की 2014 ची पुनरावृत्ती होणार?

विधानपरिषदेच्या(Legislative Council Election 2021) सहा जागांसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील(Satej Patil) आणि भाजपकडून अमल महाडिक(BJP Candidate Amal Mahadik) यांच्यात ही लक्षवेधी लढत होणार आहे. या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

amal mahadik and satej patil
अमल महाडिक आणि सतेज पाटील
author img

By

Published : Nov 16, 2021, 5:30 PM IST

कोल्हापूर - राज्यातील विधानपरिषदेच्या(Legislative Council Election 2021) सहा जागांसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढत कोल्हापूर जिल्ह्यातील होणार आहे. सतेज पाटील(Satej Patil) यांच्या विरोधात कोण असणार हा सस्पेन्स अखेर मिटला आहे. कारण भाजपकडून अमल महाडिक(BJP Candidate Amal Mahadik) यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा दोघे आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार की सतेज पाटील तेंव्हाच्या पराभवाचा थेट बदला घेणार हेच पाहावे लागणार आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा विशेष रिपोर्ट...

  • भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे होते सर्वांचे लक्ष :

विधानपरिषदेची निवडणूक जाहीर होताच पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रचाराचा सपाटाच लावला होता. मात्र त्यांच्या विरोधात भाजपकडून नेमकं कोण असणार याबाबत कमालीचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. यादरम्यान भाजपकडून अनेकांच्या नावांची चर्चा झाली. यामध्ये माजी आमदार सुरेश हाळवणकर, इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवडे यांचे चिरंजीव राहुल आवडे तसेच महाडिक परिवारातील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याही नावाची जोरदार चर्चा झाली. मात्र आज सतेज पाटील यांच्याविरोधात अमल महाडिक यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांचा अमल महाडिकांनी केला होता पराभव :

दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक अशी लढत झाली होती. यामध्ये सतेज पाटील यांचा अमल महाडिक यांनी दारुण पराभव केला होता. त्यानंतर लगेचच विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यामध्ये सतेज पाटलांना पुन्हा काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. यामध्ये त्यांनी अमल महाडिक यांचे वडील जे गेल्या 3 टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते त्या महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. विधानसभेच्या पराभवाचा बदला त्यांनी विधानपरिषेच्या निवडणुकीत घेतला. असे असले तरी त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा अमल महाडिक विरोधात सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना उमेदवारी मिळाली यात ऋतुराज पाटल यांनी अमल महाडीकांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशीच लढत होईल अशी शक्यता होती. आता पुन्हा एकदा सतेज पाटलांविरोधात अमल महाडिक यांना उमेदवारी मिळाल्याने 2014 च्या विधानसभेत झालेल्या विजयाची पुनरावृत्ती होणार ? की, सतेज पाटील तेंव्हाच्या पराभवाचा बदला विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून घेणार हेच पाहावे लागणार आहे.

  • यंदा 417 मतदार ठरविणार विधानपरिषदेचा नवा आमदार :

यंदा महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने पालिकेचे 81 मतदार कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि नव्याने स्थापन झालेल्या पालिका असे मिळून तब्बल 417 मतदार विधानपरिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीत मतदान करून नवा आमदार निवडणार आहेत. गतवेळच्या निवडणुकीपेक्षा यंदा 35 मतांची वाढ झाली आहे. गतवेळी कोल्हापूर महानगरपालिकेसह इचलकरंजी, पेठ वडगाव, मलकापूर, गडहिंग्लज, मुरगुड, कुरुंदवाड, जयसिंगपूर, कागल आणि पन्हाळा नगरपालिकेचे नगरसेवक मतदार होते. मात्र जिल्ह्यात यावेळी पाच नगरपालिका नव्याने स्थापन झाल्या आहेत. त्याचे 99 सदस्य मतदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे जरी महानगरपालिकेचे 81 नगरसेवक कमी झाले असले तरी नवीन स्थापन झालेल्या नगरपालिकांची मतदार संख्याही वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याची कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

  • दोन्हीकडून विजयाचा दावा :

दरम्यान, सतेज पाटील यांनी निवडणुका जाहीर होताच प्रचाराला तसेच वयक्तिक गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली होती. महाडिक गटाकडून सुद्धा पक्षाने जबाबदारी दिली तर निवडणूक लढविणार असे स्पष्ट केले होते. शिवाय भाजपकडून कोणालाही उमेदवारी जाऊदेत त्याच्या पाठीशी महाडिक कुटुंब असेल असे धनंजय महाडिक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार उमेदवारी आपल्याकडेच येणार हा अंदाज पाहून महाडिक गटानेसुद्धा अनेकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. स्वतः महादेवराव महाडिकसुद्धा आता मतदारांच्या वयक्तिक गाठीभेटी घेत आहेत. सतेज पाटील यांनी आपल्याकडे सद्यस्थितीत 253 जणांचा पाठिंबा असून विजयाचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे विरोधात असलेल्या महाडिक गटाकडून सुद्धा अडीचशेहून अधिक उमेदवार आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे यामध्ये आता अधिकच चुरस निर्माण झाली असून मतदार नेमकं कोणाच्या पाठीमागे राहणार हेच पाहावे लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.