ETV Bharat / business

भारताच्या विकासदराच्या तुलनेत रोजगाराचे प्रमाण नाही- आयएमएफ

गेली काही दशके देशाची भौगोलिक क्षमता ही समावेशक आणि शाश्वत विकासाशिवाय वाढली आहे. त्यामुळे तरुण आणि वाढणारे कामगारांचे मनुष्यबळ वाया जाईल, अशी आएमएफच्या अहवालात भीती व्यक्त केली आहे.

IMF
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
author img

By

Published : Dec 25, 2019, 4:29 PM IST

संयुक्त राष्ट्रसंघ - गेल्या काही वर्षात वाढलेल्या विकासदराच्या प्रमाणात विविध क्षेत्रात नोकऱ्या वाढल्या नसल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. तसेच कामगारांना काम मिळणाऱ्या बाजारपेठेतही घट झाल्याचे आयएमएफने म्हटले आहे.

आयएमएफने भारतावरील वार्षिक अहवाल वॉशिंग्टनमध्ये सोमवारी प्रसिद्ध केला. यावेळी भारतासाठी असलेल्या आयएमएफ मिशनचे प्रमुख रॅनिल सॅलगॅडो म्हणाले, जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या भारताने कोट्यवधी जणांना गरिबीमधून बाहेर काढले आहे. सध्याचे कामगार बाजारपेठेतील आकडेवारीनुसार बेरोजगारी वाढल्याचे सूचित होत आहे.

हेही वाचा-मुकेश अंबांनींच्या संपत्तीत वर्षभरात सुमारे १ लाख १२ हजार कोटींची वाढ

बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची कमी झालेल्या संख्या आणि कर्जाचे कठोर निर्णय यांनी अर्थव्यवस्था मंदावली आहे. काही महत्त्वाच्या आणि योग्य संरचनात्मक सुधारणातील प्रश्नामुळेही विकासदरावर परिणाम झाल्याचे सॅलगॅडो यांनी सांगितले.

हेही वाचा-आयटीआर भरण्याला जम्मू-काश्मीरसह लडाखमध्ये मुदतवाढ

गेली काही दशके देशाची भौगोलिक क्षमता ही समावेशक आणि शाश्वत विकासाशिवाय वाढली आहे. त्यामुळे तरुण आणि वाढणारे कामगारांचे मनुष्यबळ वाया जाईल, अशी आएमएफच्या अहवालात भीती व्यक्त केली आहे. भारताची अर्थव्यवस्था ही उपभोगाचे (कन्झम्पशन) घटलेले प्रमाण आणि गुंतवणुकीचे कमी झालेल्या प्रमाणामुळे मंदावली आहे. नियमन संस्थांच्या अनिश्चिततेने ही परिस्थिती आणखी वाईट झाल्याचे आयएमएफने अहवालात म्हटले आहे. अन्नधान्याच्या किमती झाल्याने ग्रामीण भागातील चिंता वाढल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.