ETV Bharat / briefs

पुण्यात मुलीची छेड काढल्याच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला, सात जण अटकेत

मुलीची छेड काढल्याच्या रागातून एका तरुणावर मुलीच्या नातेवाईकांनी कोयता आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

author img

By

Published : Jun 9, 2020, 8:57 PM IST

pune crime news
pune crime news

पुणे - मुलीची छेड काढल्याच्या रागातून एका तरुणावर मुलीच्या नातेवाईकांनी कोयता आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रारीवरून तीन महिला आणि चार पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

बबलू चितरू परदेशी (वय 51), रिषभ बबलू परदेशी (वय 19), आकाश पप्पा परदेशी (वय 28), राजू चितरू परदेशी (वय 59) आणि तीन महिला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा नातेवाईक असलेल्या मुलीला आरोपीच्या बहिणीचा मुलगा छेडत होता. यावरून त्यांच्यात काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडणेही झाली होती. परंतु पोलिसात तक्रार न देता त्यांनी आपापसात हा वाद मिटवला होता.

दरम्यान, रविवारी (7 जून) तक्रारदार आणि त्यांची आई, बहीण असे वानवडी गावात घरासमोर बसले होते. यावेळी आरोपी महिलांनी त्यांना शिवीगाळ केली. यावेळी तक्रारदार यांचे मेहुणे शक्ती बिडलान हे त्याठिकाणी आले. त्याचवेळी वर नमूद केलेल्या आरोपींनी बिडलांन यांच्यावर कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर, हातावर मार लागल्याने बिडलांन या हल्ल्यात गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत सात जणांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.