ETV Bharat / bharat

व्हिडिओ: कर्नाटकात खासगी ट्रॅव्हल्सने घेतला पेट, 30 प्रवासी जखमी

बसला आग लागल्यानंतर चालक आणि इतर कर्मचारी पळून गेले. आग लागलेली बस रॉयल ट्रॅव्हल या खासगी कंपनीची आहे.

ट्रॅव्हल्स पेटली
author img

By

Published : Sep 14, 2019, 1:35 PM IST

बंगळुरु - कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यातून बंगळुरुला जात असताना एका खासगी ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. या आगीमध्ये ३० प्रवासी होरपळून जखमी झाले आहेत. ही घटना तुमकूर जिल्ह्यातील ओरुकीरी येथे राष्ट्रीय महामार्ग ४ वर काल(शुक्रवारी) मध्यरात्री घडली.

कर्नाटकात खासगी ट्रॅव्हल्स घेतला पेट

या घटनेत एक महिला गंभीर भाजली आहे. तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसला आग लागल्यानंतर चालक आणि इतर कर्मचारी पळून गेले. आग लागलेली बस रॉयल ट्रॅव्हल या खासगी कंपनीची आहे.

bus fire
आग विझवल्यानंतरचे छायाचित्र

रात्रीची आग लागल्याने बसमधील बरेच प्रवासी झोपलेले होते. आग लागताच एकच आरडाओरडा झाला. बसमधून खाली उतरण्यासाठी पळापळ सुरू झाली. थोड्याच वेळात बसने पूर्णपणे पेट घेतला. आगीचे लोळ महामार्गावर पसरले. थोडक्यात बचावले असले तरी सर्व प्रवासी भयभीत झाले होते. आग लागलेली खासगी बस यादगिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

Intro:Body:

mar national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.