नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मागील काही दिवसांपासून वाढलेले शुल्क आणि होस्टेल नियमावलीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. काल(शनिवार) विद्यापीठाचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांच्यावर विद्यार्थ्यांनी हल्ला केला. सुरक्षा रक्षकांनी मोठ्या प्रयत्नानंतर कुलगुरुंना विद्यार्थ्यांच्या तावडीतून सोडवले. यावर विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली.
JNU आंदोलन: विद्यार्थ्यांनी दहशतीचं वातावरण निर्माण केलं; दोषींवर कारवाई करणार
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मागील काही दिवसांपासून वाढलेले शुल्क आणि होस्टेल नियमावलीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. काल (शनिवार) विद्यापीठाचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांच्यावर विद्यार्थ्यांनी हल्ला केला.
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मागील काही दिवसांपासून वाढलेले शुल्क आणि होस्टेल नियमावलीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. काल(शनिवार) विद्यापीठाचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांच्यावर विद्यार्थ्यांनी हल्ला केला. सुरक्षा रक्षकांनी मोठ्या प्रयत्नानंतर कुलगुरुंना विद्यार्थ्यांच्या तावडीतून सोडवले. यावर विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली.
JNU आंदोलन: विद्यार्थ्यांनी दहशतीचं वातावरण निर्माण केलं; दोषींवर कारवाई करणार
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मागील काही दिवसांपासून वाढलेले शुल्क आणि होस्टेल नियमावालीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. काल(शनिवार) विद्यापीठाचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांच्यावर विद्यार्थ्यांनी हल्ला केला. सुरक्षा रक्षकांनी मोठ्या प्रयत्नानंतर कुलगुरुंना विद्यार्थ्यांच्या तावडीतून सोडवले. यावर विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली.
यावर बोलताना कुलगुरु एम. जगदीश कुमार यांनी या घटनेची निंदा केला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे आणि शिक्षकांवर हल्ला करणे वेगळी गोष्ट आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांवर कारवाई होणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांवर होणार प्रशासकीय कारवाई
विद्यार्थ्यांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांना मोकळे सोडले जाणार नाही. पोलीस तक्रारी बरोबरच विद्यापीठाच्या नियमांनुसारही विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तीन दिवसांपूर्वी कुलगुरुंना सुरक्षा मिळाली होती. मात्र, विद्यापीठात येताच विद्यार्थ्यांनी कुलगुरुंवर हल्ला केला होता.
कुलगुरुंना शारिरीक दुखापत करण्याचा प्रयत्न
कुलगुरु 'स्कूल ऑफ आर्ट अॅड एस्थेटीक' विभादाच्या परिक्षेची पाहणी करण्यासाठी विद्यापीठात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांनी घेरले. तसेच शारिरिक दुखापत करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी मोठ्या हिकमतीने त्यांनी विद्यार्थ्यांच्या गराड्यातून सोडवले. विद्यार्थ्यांनी अॅडमीन ब्लॉकमध्ये घुसून दरवाजे तोडले तसेच आतील सामान अस्ताव्यस्त फेकले. सीसीटीव्ही फुटेज पाहून हल्ला करणाऱया विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात येणार आहे. या प्रकरणाची प्रशासन चौकशी करणार असून दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, असे कुलगुरुंगी सांगितले.