ETV Bharat / state

Maha: Investigation documents against Hingoli's PI sent to SC Commission

One more case has been registered against a police inspector of Hingoli police station. Eight months ago the official had denied to lodge a complain from a scheduled caste complainant. Inspector General has now demanded investigation against the accused official.

Hingoli police station
author img

By

Published : Mar 1, 2019, 8:15 PM IST

Hingoli: Amidst the instances of cases against the Hingoli police officials, one more case have been registered against a police inspector Ganpat Rahire of Kalamnuri police station.

Reportedly, eight months ago a complainant of a scheduled caste had come to the police station to lodge a complain and Ganpat had not entertained the complainant.

The complainant was sent back without lodging a complain.

Following which the Inspector General, Kaiser Khalid has now demanded an investigation under the Prevention of Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act against the officer.

The official documents of the case has been processed and sent to the Scheduled Castes Commission for further investigation.

Also read: Policeman saves woman from being crushed under train at Malad

Hingoli: Amidst the instances of cases against the Hingoli police officials, one more case have been registered against a police inspector Ganpat Rahire of Kalamnuri police station.

Reportedly, eight months ago a complainant of a scheduled caste had come to the police station to lodge a complain and Ganpat had not entertained the complainant.

The complainant was sent back without lodging a complain.

Following which the Inspector General, Kaiser Khalid has now demanded an investigation under the Prevention of Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act against the officer.

The official documents of the case has been processed and sent to the Scheduled Castes Commission for further investigation.

Also read: Policeman saves woman from being crushed under train at Malad

Intro:वर्षभरापासून हिंगोली चे पोलीस प्रशासन या नात्या कारणावरून चर्चेत राहते, मात्र आता चक्क शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक असलेल्या काळात बऱ्याच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने मात्र जास्तच चर्चा रंगत आहे. त्यातच आता कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोनि गणपत राहिरे यांच्यावर कारवाई करून पुढील कारवाईसाठी सर्व कागदपत्रे जोडून अनुपालन अहवाल अनुसूचित जाती आयोगाकडे पाठविण्याचे आदेश पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत.

त्यातच चांगलीच चरतर कधी लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आकडेवारीवरून हिंगोली चे पोलीस प्रशासन शिस्तप्रिय पोलीस अधीक्षकांच्या काळात चांगलेच गाजलेले असल्याचे दिसून येतेय. बहुतांश पोलीस ठाण्यातील ठाणेदार कोणत्या ना कोणत्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेलेच आहेत. त्यांना वाचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत असले तरी कायद्यापुढे सारे समान असल्याने अनेक पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई


Body:कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे यांच्यावर अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी आठ महिन्यांपूर्वी जयदीप दिपके यांनी आयोगाकडे केली होती. तेव्हापासूनच पोलीस प्रशासनामध्ये वादळ निर्माण झाले होते. आता त्या मागणीवर कारवाई करून पुढील कारवाईसाठी सर्व कागदपत्र सोबत जोडावे व अनुपालन अहवाल आयोगाकडे पाठविण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे पोलीस महानिरीक्षक कैसर खलीद यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यामुळे पुन्हा पोलीस प्रशासनामध्ये मात्र खळबळ उडालेली आहे. विशेष म्हणजे वर्षभरापासून हिंगोली चे पोलीस प्रशासन चांगलेच चर्चेत आले आहे. ते कधी पोलीस निरीक्षकांच्या कामकाजावरून तर अधून मधून बहुतांश पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने, तर वसमत येथील शहर पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार दाखल करून न घेणे तीन पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. मागासवर्गीय आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेतली. तसेच अधून मधून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा देखील त्रास काही शिस्तबद्ध असलेल्या ठाणेदाराला सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर एक पेक्षा जास्त लाचलुचपत विभागाच्या कारवाया झाल्याने ठाणेदाराच्या बदल्या ही झाल्याचे समोर आले आहे.


Conclusion:प्रत्येक वेळी नवं नवीन तक्रारी, नवं नवीन कारवाई, असे वेगवेगळेच पोलिस प्रशासनात समोर येत असल्याने हिंगोलीचे पोलीस प्रशासन चांगलेच चर्चेत येत आहे. दोन दिवसांपूर्वी सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांने चक्क अवैध दारू चालू देण्यासाठी स्वतःला एक हजार अन ज्या बिट जमादाराच्या बिटात दारू विक्री करायची त्याला ५०० रुपये अशी एकूण दीड हजाराची मागणी केल्याने लाचलुचपत विभागाने कारवाई केली. त्याच्यावर त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्या पाठोपाठ आता जी. एस. राहिरे चे देखील प्रकरण अनुसूचित जाती आयोगापर्यंत पोहोचल्याने राहिरे वर देखील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सेनगाव सारख्या पोलीस ठाणे हद्दीत चोरटे वाटमारीचे नवनवीन फंडे आजमावून प्रवाशांना गंडा घालत आहेत. मात्र एक घटना वगळता इतर अनेक घटनेतील चोरटे अजूनही हाती लागले नाहीत. विषेश म्हणजे सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोऱ्या, वाटमारीचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. तर आखाडा बाळापूर पोलीस ठाणे जुगार अन गुटख्या मुळें चर्चेत आहे. हे सर्व प्रकार शिस्तप्रिय असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या काळात सुरू असल्याने नागरिक अचंबित झाले आहेत. त्यातच होमगार्ड कार्यालयांत तर सर्व पातळीच ओलांडली असून, पूर्वी स्वच्छ असलेल्या कार्यालय परिसरातच दारूच्या बाटल्याचा खच पडला आहे. अन येथे कार्यरत असलेल्या केंद्रनायकाने तर अनेज होमगार्ड ला सळो की पळो करून सोडले आहे. एवढेच नव्हे तर महिला होमगार्डला या केंद्र नायकाचा खूप त्रास आहे. मात्र भिती पोटी अनेक महिला होमगार्ड केंद्र नायकाचा त्रास सहन करून घेत आहेत. तर होमगार्ड ची कमी उपस्थिती दाखविण्याचा प्रकार नेहमीचाच आहे. अनेक तक्रारी झालेल्या असल्या तरी शिस्त प्रिय म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधीक्षकाने अजून तरी या विभागाकडे वळून पाहिलेले नसल्याची खंत अनेक होमगार्ड व्यक्त करीत आहेत. वरून केंद्र नायकच अन्याय झालेल्या होमगार्ड ला वरिष्ठांच्या पाया पडण्याचे सल्ले देत सुटला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.