महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्ध्यात कोण मारणार बाजी? - Lok Sabha Election Result 2024
Published : Jun 4, 2024, 10:23 AM IST
वर्धा Wardha Lok Sabha Constituency : वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. सुरुवातीला टपाली मतदान मोजणी केली जात आहे, त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी होईल. टपाली मतमोजणीसाठी 9 आणि इटीपीबीएस मतमोजणीसाठी 5 टेबल लावण्यात आले आहेत. ईव्हीएम मशिनसाठी प्रत्येक विधानसभा निहाय 14 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडली जात आहे. तर प्रत्येक टेबलवर एक सहाय्यक, सुपरवायझर आणि सुक्ष्म निरीक्षक असे तीन अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. वर्धा विधानसभा मतदार संघात 24 फेऱ्या, मोर्शी विधानसभा मतदारसंघात 23 फेऱ्या, धामणगाव (रेल्वे) विधानसभा मतदारसंघात 27 फेऱ्या, आर्वी विधानसभा मतदारसंघात 22 फेऱ्या, देवळी विधानसभा मतदारसंघात 24 फेऱ्या आणि हिंगणघाट विधानसभा मतदार संघात 25 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय.