Ambedkar Jayanti : तीन हजार पुस्तकांच्या सहायाने साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती
नाशिक - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या जयंतीच्या ( Ambedkar Jayanti ) पूर्वसंध्येला तब्बल तीन हजार पुस्तकांचा वापर करत शालेय मैदानात साडेपाच हजार चौरस फुट, अशी बाबासाहेबांची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली आहे. नाशिकच्या चांदवड येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी महामानवास अनोखे अभिवादन केले आहे. ही कलाकृती दोन दिवसांत बारा तास भर उन्हात उभे राहत पूर्णत्वास नेली असून यात तीन हजार पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. पुस्तकांसाठी भव्य असे घर बांधणाऱ्या या महामानवाने अवघे आयुष्य पुस्तके लिहिण्यात आणि वाचनात खर्ची केले. तसेच देशासाठी एक परिपूर्ण संविधान दिले. 'वाचाल तर वाचाल' हा संदेश देत त्यांनी समाजाला वाचनाची प्रेरणा दिली. म्हणून विद्यार्थ्यांची मानवी साखळी करत 'वाचाल तर वाचाल' हा संदेशही त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला दिला आहे. भाटगाव येथील (ता. चांदवड) नूतन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ही भव्य अशी कलाकृती साकारली आहे.