महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : भाजप आमदाराने धरले विधानसभेच्या सभापतींचे पाय.. म्हणाले, 'आम्हाला माफ करा..'

By

Published : Aug 4, 2022, 7:05 PM IST

रांची ( झारखंड ) : झारखंड विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Jharkhand Assembly monsoon session) पाचव्या दिवशी सभागृहाबाहेर अनोखे दृश्य पाहायला मिळाले. कामकाज सुरू होण्यापूर्वी सभापतींच्या दालनाबाहेर भाजप आमदारांनी निदर्शने (BJP MLAs Protest) केली. काल गोंधळ घातल्याने सभापतींनी भाजपच्या चार आमदारांना निलंबित केले होते. हे निलंबन मागे घेण्यासाठी आज सभापती रवींद्र नाथ महतो सभागृहात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या चेंबरमधून बाहेर येताच भाजप आमदार राज सिन्हा सभापतींच्या पायावर (BJP MLA lay on speaker feet) पडले. राज सिन्हा (BJP MLA Raj Sinha) यांनी सभापतींचे पाय धरले आणि भाजप आमदारांना निलंबन मागे घेण्याची विनंती केली. यानंतर सभापतींनी हसत हसत त्यांची विनंती मान्य करत निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापतींनी भाजपचे चार निलंबित आमदार भानू प्रताप शाही, धुल्लू महतो, जयप्रकाश पटेल आणि रणधीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्याची घोषणा केली.

ABOUT THE AUTHOR

...view details