ED Raid At Sanjay Raut House: शिवसेनेची खिंड लढविणाऱ्या संजय राऊतांवर ईडीची कारवाई
मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) यांच्या मुंबईतील भांडूप इथल्या निवासस्थानी अंबलबजावणी संचालनालयाने ( ED Raid At Sanjay Raut House ) छापा टाकला. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारच्या प्रकरणात त्यांची या आधी तीन वेळा चौकशीही झाली आहे. आज ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला. ईडीकडून संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे. ईडीने यापूर्वी दोनदा समन्स बजावले होते. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राऊत यांनी वेळ मागवून घेतली ( ED Raid Sanjay Raut home ) होती. मात्र सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केल्याने राऊत यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ईडीकडे तक्रार केली ( Kirit Somaiya complained to ED ) होती. ईडीने राऊत यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. १ जुलै रोजी ईडीने १० तास चौकशी केली. त्यानंतर पुन्हा दोन वेळा संजय राऊत यांना समन्स बजावले. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे सांगत राऊत यांनी मुदत वाढ मिळावी, अशी मागणी केली होती. या संपूर्म परिस्थीती आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनीधींनी.