World Environment Day : जागतिक पर्यावरण दिना निमित्त केला सलग चोवीस तास पोहण्याचा विक्रम
औरंगाबाद : जागतिक पर्यावरण दिवसाचे ( World Environment Day ) औचित्य साधून जलतरणपटू राजेश भोसले ( Swimmer Rajesh Bhosale ) यांनी सलग चोवीसतास पोहण्याची विक्रम ( Swimming record for 24 consecutive hours ) केला आहे. निसर्गामुळे आपल्याला श्वास घेता येतो, पोहताना श्वास किती महत्वाचा आहे, हे कळत असल्याने सलग पोहण्याचा उपक्रम केल्याची माहिती जलतरणपटू राजेश यांनी यांनी दिली. एमजीएम येथील जलतरण तलाव येथे जलतरणपटू राजेश यांनी यांनी सलग चोवीसतास पोहण्याची किमया केली आहे. सलग पोहत असताना प्रत्येक तासाला पाच मिनिटे वैद्यकीय तपासणीसाठी विश्रांती घेण्यात आली. मागील वर्षी सलग 20 तास पोहण्याची किमया राजेश भोसले यांनी केली होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राजेश जलतरण तलावात उतरले होते. भावी पिढी सशक्त रहावी, पर्यावरणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. पोहताना श्वास घेण्याचे महत्व कळाले. तो श्वास पर्यावरणामुळे मिळतो. जुन्या पिढीने वृक्ष लावले म्हणून आज आपल्याला जीवन जगता येत आहे. त्यामुळे आपले पर्यावरण आपली जबाबदारी असा उपक्रम राबवल्याची माहिती जलतरणपटू राजेश यांनी यांनी दिली. तर उपक्रम राबवत असताना काही नागरिकांनी आणि लहान मुलांनी सोबत काही वेळ पोहून त्यांना साथ देत उपक्रमात सहभाग नोंदवला.