'यमराज लबाड बायकांना सेवा मुक्त कर', औरगांबादेत पत्नीपीडितांचं अनोखं आंदोलन
महाराष्ट्रात रविवारी वटपोर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाला पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करते. मात्र, औरंगाबाद येथे पत्नीपीडित पतींनी अनोखं आंदोलन छेडलं आहे. येथील वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुरुषांनी पुढच्या जन्मी, अशी पत्नी नको, अशी मनोकामना यमराजाकडे केली आहे.