महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Solapur Blind Artist : अंधत्व असतानाही शेतात चितारले हे अनोखे चित्र अन् केले नव्या वर्षाचे स्वागत

By

Published : Jan 1, 2022, 9:20 AM IST

Updated : Jan 1, 2022, 4:11 PM IST

(सोलापूर) - देश-विदेशात नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. बार्शी तालुक्यातील जामगाव येथील एका डोळ्याने अंध असणाऱ्या चित्रकार महेश मस्के यांच्या संकल्पनेतून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ( Welcome New Year 2022 ) कांद्याच्या शेतामध्ये '2022 हॅप्पी न्यू इयर' असा संदेश देत कलाकृती साकारली आहे. ही अनोखी कलाकृती साकारण्यासाठी त्यांना तीन तासाचा वेळ लागला. सोशल मीडियावर या कलाकृतीचे जिल्हाभरातून मोठे कौतुक होत आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन 2022 नवीन वर्षामध्ये सर्व जण आपल्या परीने शुभेच्छा देण्याचे ठरवत असतात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बार्शी येथील एका डोळ्याने अंधत्व असणाऱ्या चित्रकार महेश मस्के यांनी अर्ध्या एकर जमिनीवर इंग्रजी भाषेत लिहिलेले '2022 हॅप्पी न्यू इयर' संदेश देणारी कलाकृती कांदा रोपाच्या सहाय्याने साकारण्यात आली. यासाठी महेश मस्के यांच्या टीमला सुमारे तीन तासांचा अवधी लागला होता. यामध्ये हजारो कांदा रोपे वापरण्यात आली. यातून ड्रोन कॅमेराचा वापर करून सदर कलाकृती टिपण्यात आली. यंदाच्या वर्षी तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा. राज्यातील शेतकरी अनेक संकटातून यंदाचे वर्ष पार केले आहे. मात्र, येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये शेतकऱ्याच्या मालाला योग्य दाम मिळावा, या हेतूने चित्रकार महेश मस्के यांनी आपल्या टीमच्या मदतीने कांदा पिकाच्या साह्याने कलाकृती साकारली आहे.
Last Updated : Jan 1, 2022, 4:11 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details