शिकारचा पाठलाग करत वाघ पडला विहिरीत; बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
चंद्रपूर - रात्रीच्या वेळी शिकारचा पाठलाग करताना पट्टेदार वाघ थेट विहिरीत पडला. ही घटना वरोरा येथील साखरा शेतशिवारातील असून या वाघाला बाहेर काढण्यासाठी वनविभागाची टीम दाखल झाली असून यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मोखाडा रस्त्यावरील साखरा येथील शेतशिवारात वाघ शिकारचा पाठलाग करत असताना थेट विहिरीत पडला. शेतकरी गमन शिरपाते यांच्या शेतातील विहिरीत हा वाघ पडला. सकाळी काही लोकांची विहिरीत डोकावले असता त्यांना वाघ विहिरीत पडल्याचे दिसून आले. वाघाला बाहेर काढण्यासाठी वनविभागाची स्थानिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. वाघाला विहिरी बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.