मुसळधार पावसामुळे शेतात शिरले पाणी, जमिन खरडून गेल्याने शेतकरी चिंतेत
अमरावती - जिल्ह्यातील येवदा अकोट रोडवर सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर अंतर्गत एका पुलाचे काम सुरू आहे. पावसाळा सुरू झाला मात्र तरीही काम पूर्ण न झाल्याने कंत्राटदाराकडून पुलाचे रक्षण करण्यासाठी बांध बांधला. या दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने पाणी परिसरांमधील शेतांमध्ये शिरले. त्यामुळे शेतातील माती वाहून गेली असल्याने ते पेरणी करण्यायोग्य राहिलेले नाही. या पावसाचा सर्वसामान्य नागरिकांनादेखील मोठा फटका बसला. त्यांना चिखलाच्या पाण्यातून वाट काढून जावे लागले.