VIDEO - कर्ज देणारे-घेणारे, कर्जाला हमी देणारे तेच; ऐका काय म्हणाले राजू शेट्टी...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज (2 जुलै) कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील साखर कारखाने, उसाचे दर, दुधाचे दर आणि यावरून सुरू असलेले राजकारण यावर भाष्य केले. तसेच, सध्या महाराष्ट्रात साखर कारखान्याच्या संबंधीची चौकशी ईडी करत आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीसंबंधीही त्यांनी भूमिका मांडली. तर, ईडीने आज साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. ईडीने एकूण ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. विशेष म्हणजे, हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडी आता पवारांच्या मागे लागल्याचं बोललं जात आहे. एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारखान्यावर ही कारवाई केली.