'राजगृह' बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचा अमुल्य ठेवा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. 14 एप्रिल हा दिवस भीम अनुयायांसाठी सोनियाचा दिनू. याच दिवशी शोषीत, पीडित, दीनदलितांच्या मुक्ती दात्याचा जन्म झाला. बाबासाहेबांचा स्पर्श ज्या ज्या वास्तूला झाला ती वास्तू कोण्या तीर्थस्थळापेक्षा नक्कीच कमी नाही. त्यांपैकी एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह'. याच राजगृहात बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाई यांच्या संसारातील अनेक गोष्टी आहे. याच राजगृहात बाबासाहेब आंबेडकर यांची अभ्यास खोली आहे. बाबासाहेबांची पुस्तकं, त्यांच्या हातकाठ्या, संविधानाची प्रतही ठेवण्यात आली आहे.