महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

चंद्राच्या अनेक फोटोतून एकच फोटो साकारणारा 'फोटोग्राफर'

By

Published : Jun 4, 2021, 9:30 AM IST

पुणे - शहरातील एका १६ वर्षीय तरुणाने चंद्राचे तब्बल ५५ हजार छायाचित्र टिपत या उपग्रहाचे अतिशय सुस्पष्ट आणि मनमोहक छायाचित्र तयार केले आहे. प्रथमेश जाजू असे या छायाचित्रकाराचे नाव असुन तो पुण्यातील ज्योर्तीविद्या संस्थेशी निगडीत आहे. चंद्राची छोट्या-छोट्या भागांची छायाचित्र टिपण्यास सुरुवात करत, त्याने ही कीमया साधली आहे. प्रथमेशने ३ मे रोजी रात्री दीड ते साडेपाचच्या दरम्यान गच्चीवरुन चंद्राची काही छायाचित्र टिपले आहेत. त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारचा कॅमेरा आहे. फोटो टिपण्यासाठी हा कॅमेरा अगोदर व्हिडिओ रेकॉर्ड करतो. एका व्हिडिओत हा कॅमेरा दोन हजार फोटो छायाचित्रीत करतो. त्याने चंद्राचे एकून ३८ व्हिडिओ चित्रीत केले आहेत. यातूनच त्याने चंद्राच एक अनोख चित्र तयार केले व सोशल मीडियावर टाकले. सोशल मीडीयावर हे छायाचित्र प्रचंड व्हायरल झाले व प्रथमेशवर कौतुकांचा वर्षाव सुरु झाला. ५५ हजार छायाचित्रांपासुन तयार केलेले हे अनोखे छायाचित्र वैज्ञानिक अविष्काराचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. प्रथमेशने आतापर्यंत अंतराळातील वेगवेगळे ग्रह आणि ताऱ्यांचे चित्रही टीपले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details